मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.  महापालिकेतील काँग्रेसच्या नगरसेविका शितल म्हात्रे यांनी काही आक्षेपांच्या आधारे निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केली आहे.


मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. वार्डरचना आणि मतदारयाद्यांच्या प्रारुप आणि अंतीम आराखड्यात फरक असल्याचा दावा करत काँग्रेसनं निवडणूक आयोगात धाव घेतली आहे.

मुंबई महापालिकेसाठी बनवण्यात आलेल्या मतदारयाद्यांमध्ये मतदार संख्या आणि लोकसंख्या यामध्येही तफावत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. तसंच मतदारांची माहितीही पूर्ण नसल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला आहे.

काय आहेत काँग्रेसचे आक्षेप?

  1. वॉर्डरचना आणि मतदारयाद्यांच्या प्रारुप आणि अंतीम आराखड्यात फरक असल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. अंतीम आराखड्यात आणि प्रारुप आराखड्यात नसलेल्या चूकीच्या माहितीचा समावेश असल्याचंही काँग्रेसनं म्हटलं आहे.

  2. मतदारसंख्या आणि लोकसंख्या यांचं व्यस्त प्रमाण


उदा. दादर-प्रभादेवी भागांत मतदारसंख्या जास्त तर लोकसंख्या कमी

वार्ड क्र. 194 मध्ये मतदार 60 हजार तर लोकसंख्या 58000

वॉर्ड क्र. 1 मध्ये लोकसंख्या 50000 तर मतदारसंख्या 25000

  1. मतदारांचे पूर्ण पत्ते आणि फोटो यांची माहिती मतदारयादीत नाही.