Mira Road Tension:  मीरारोड (Mira Road)  मधील नया नगर (Naya Nagar)  येथील तणावाच वातावरण काही केल्या निवलण्याचे नाव घेत नाही. मंगळवारी पालिकेने नया नगर येथे दुकानाच्या अनधिकृत शेडवर तोडक कारवाई केली. तर नया नगर पोलिसांनी आतापर्यंत 13 जणांनाच अटक केली आहे. त्यात चार जण अल्पवयीन आहे. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)  यांनी पालिका आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री फडणवीसांना दोन तीन अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 


  रविवारी राञी रॅली आटपून येणाऱ्या रामभक्तांवर मीरा रोडच्या नया नगर येथे काही समाजकंटकांनी मारहाण करुन, त्यांच्या गाडीची तोडफोड केली होती. यावरुन नया नगर मध्ये सध्या दोन दिवसापासून संघर्षमय वातावरण सुरु आहे. दिवसभर दोन्ही समाजाचे कार्यकर्ते आक्रमक दिसून आले होते.  पोलीस आयुक्तालयाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. राज्य राखीव दलाचे दोन पथक, दंगल नियंञणचे दोन पथक तर एम.बी.व्ही.व्ही. पोलीस आयुक्तालयाचे 342 पोलीस कर्मचारी, दोन पोलीस निरीक्षक, 34 पोलीस कर्मचारी उपस्थित होते.  नया नगरच्या हैदरी चौक येथे  20 ते25  दुकानाचे अनधिकृत शेडवर पालिकेने  कारवाई केली.  तर नया नगरच्या प्रकरणात आतापर्यंत सात एफआयआर नोंद झाले तर, रविवारी झालेल्या प्रकरणात आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात चार जण अल्पवयीन आहेत. तर 20 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. 


नितेश राणेंनी जखमींची विचारपूस केली


 नितेश राणे यांनी रविवारी जखमी झालेल्या तरुणांची आणि महिलांची भेट घेवून, विचारपूस केली. त्यानंतर पोलीस आयुक्त मधुकर पांडे याच्यांशी ही याबाबत चर्चा केली. नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत पोलीस आणि पालिकेच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली पोलिसांच्या फेल्युअरपेक्षा डिपार्टमेंटमधील दोन तीन सडके आंबे आमच्या सरकारच नाव खराब करत असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आहे.  पोलीस आयुक्त, पालिका आयुक्त आणि नया नगरचे पोलीस निरीक्षक यांच नाव न घेता केला आहे.  पोलीस तुटपुंजी कारवाई करत, पोलीस त्या लोकांचे लाड करत असल्याचा आरोप केला आहे. 


ज्या ठिकाणी दंगली घडल्या त्या त्या ठिकाणी कारवाई होणार


फडणवीस यांना मीरा रोडची सर्व हकीकत सांगू, मी फडणवीसांचे कान आणि डोळे बनून येथे आलोय. पोलीस आयुक्त, नया नगर पोलीस निरीक्षक आणि पालिका आयुक्तांना सडके आंबे म्हणून, तीव्र नाराजी व्यक्त केली. एक एक अधिकारी कसे घरी जातात ते बघा असं वक्तव्य केलं. महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी दंगली घडल्या त्या त्या ठिकाणी कारवाई होणार, हे महाविकास आघाडीचे सरकार नाही आमचे सरकार आहे, असं वक्तव्य केलं. 


पोलिसांवर तीव्र नाराजी


व्हयरल झालेल्या एका वादग्रस्त व्हिडीओतील तरुणांवर तीव्र आक्षेप घेत, हा आत्मविश्वास ठेचून काढायचा आहे. असं म्हणत तो तरुण येथे उद्या बॅरेकेट लागणार, तुम्ही कसे येणार असा फाजिल आत्मविश्वासाने बोलत होता. आणि पोलिसांनी दुस-या दिवशी पोलिसांनी नया नगर परिसरात बॅरेकेट लावून, बंदी केली होती. 24 तासात हे बॅरेकेट काढून टाकण्यात यावे असे सांगितले आहे.  त्यामुळे राणे यांनी येथील पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त करत, अधिवेशनाला याबाबत जाब विचारला जाईल. नया नगरमध्ये 35 हिंदू मुलींच धर्मांतर करण्यात आल्याचा आरोप करत, हिंदू समाजावर केस करत, लाठीचार्ज पोलिसांनी केल्याचा आरोप केला आहे. नया नगरात कुणाचे लाड होतात ते बघतो. पोलीस आयुक्तांबाबात बोलताना त्यांना राणे म्हटले की,  तुमच्यामुळे आमचे सरकार बदनाम होतेयं. अधिवेशनाला दाखवतो, तुमची सस्पेन्शन ऑर्डर देतो. मग रडायच नाही, त्यावेळी जिहादी वाचवायला येणार नाही असं तीव्र शब्दात पोलीस आयुक्तांवर नाराजी व्यक्त केली. 


हे ही वाचा :


मीरारोडमध्ये दोन गटात मिरवणुकीदरम्यान वाद, वाहनांची तोडफोड; सध्या परिस्थिती नियंत्रणात