मुंबई : मुंबई उपनगरातील चेंबूर, घाटकोपर, भांडूप आदी भागात टेकडीखालील संभाव्य दरडी कोसळण्याचा धोका असणाऱ्या वस्त्यांच्या संरक्षणासाठी तातडीची उपाययोजना म्हणून संरक्षक भिंती बांधण्याची आवश्यकता आहे. अशा धोकादायक परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंती बांधण्याची कार्यवाही मुंबई महानगरपालिकेने (BMC) तातडीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.
आपत्ती निवारणासाठी केंद्र सरकारकडून निधी प्राप्त होताच त्या खर्चाची प्रतिपुर्ती मुंबई महानगरपालिकेला करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारच्या मदत आणि पुनर्वसन विभागाला दिल्या.
मुंबई उपनगरातील चेंबूर, घाटकोपर, भांडूप व अन्य ठिकाणी टेकडीखाली असलेल्या वस्तींच्या संक्षणासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वित्त विभागाच्या सचिव (वित्तीय सुधारणा) श्रीमती शैला ए., आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक आप्पासाहेब धुळाज उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुंबई उपनगरातील चेंबूर, घाटकोपर, भांडूप आदी भागात टेकडीखाली दरडी कोसळण्याचा धोका असणाऱ्या अनेक वस्त्या आहेत. अशा धोकादायक ठिकाणी अनेक नागरिक वास्तव्यास आहेत. अशा धोकादायक ठिकाणी दुर्घटना घडू नये, जिवीत व वित्त हानी होऊ नये, यासाठी प्राधान्याने उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेने या भागात संरक्षकभिंती बांधण्यासह इतर आवश्यक कामांना प्राधान्य द्यावे.
मुंबई उपनगरातील अशा धोकादायक ठिकाणांचे सर्व्हेक्षण राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने आयआयटी-मुंबई मार्फत केले असून त्याची यादी तयार करण्यात आली आहे. अशा संभाव्य धोकादायक भागात मुंबई महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना राबवाव्यात. आपत्ती निवारणासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळताच मुंबई महानगर पालिकेला खर्चाची प्रतिपुर्ती करण्यात येईल. राज्य सरकारनच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून ही प्रतिपूर्ती करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिल्या.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता पात्र क्रीडाप्रकारांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर, यॉटींग आणि इक्वेस्टेरियन या सात क्रीडाप्रकारांना पुन्हा शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र ठरवण्यात यावे. तसेच जिम्नॅस्टिकमधील उपप्रकार असलेल्या एरोबिक्स व ॲक्रोबॅटिक्स या क्रीडा प्रकारांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या यादीत नव्याने सामावेश करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिंम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिले. यंदाच्या (सन 2022-2023) पुरस्कारांसाठी फेरसमाविष्ट केलेल्या क्रीडा प्रकारातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने तातडीने मागवून तेही विचारात घ्यावेत, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.
ही बातमी वाचा: