Mira Bhaindar Municipal Corporation : केंद्र सरकारने स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022 ची घोषणा केली आहे. यात 'स्वच्छ सर्वेक्षण 2022' (cleanliness survey)मध्ये मीरा भाईंदर (Mira Bhaindar City) शहराने देशात बाजी मारत महानगरपालिका (Mira Bhaindar Municipal Corporation)गटात पारितोषिक मिळवले आहे. मीरा भाईंदर शहर 3 लाख ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात महाराष्ट्र राज्यात (Maharashtra News) पहिल्या क्रमांकावर आले असून देशपातळीवर 7 व्या स्थानी मानांकित झाले आहे.
'कचरामुक्त शहर' या गटात 3 स्टार मानांकनासह विशेष बक्षिसे देखील पटकवली आहेत. सिटीझन फीडबॅक मध्ये देशपातळीवर प्रथम क्रमांक देखील संपादन केला आहे. देशपातळीवर झालेल्या या सर्वेक्षणात 4300 पेक्षा जास्त शहरांनी सहभाग घेतला होता. महानगरपालिका स्तरावर या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर खूप आव्हाने समोर होती. 7500 गुणांच्या या स्पर्धेत विविध बाबी तपासल्या गेल्या.
महापालिकेने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली आहे. आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनात पालिकेने सर्व क्षेत्रात चौफेर काम केले आणि वर्षभरात विविध बक्षिसे मिळविली.यामध्ये राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार, माझी वसुंधरा अभियान पुरस्कार अशा अत्यंत प्रतिष्ठेच्या बक्षिसांचा समावेश आहे.
शहरातील स्वच्छतेचा स्तर कमालीचा उंचावला
मागील वर्षभरात आयुक्तांनी सकाळी राबविलेल्या walk with commisioner सारख्या उपक्रमातून शहरातील स्वच्छतेचा स्तर कमालीचा उंचावत गेला. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सकाळी पाहणी करून रोजच्या रोज शहरात अधिकाऱ्यांची फौज कामात गुंतून होती. शहराच्या सर्व प्रभागातील मुख्य भिंतींवरील आकर्षक पेंटिंग्ज, कारंजे,आणि चौक सुशोभिकरण, टाकाऊ भंगारापासून आकर्षक कलाकृती, माणुसकीची भिंत, अद्ययावत उद्याने, स्वच्छ दुभाजक आणि पदपथ यासारख्या अनेक उपक्रमाची आखणी करून शहरात स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी नागरिकांचा सहभाग घेण्यात आला.
नागरिकांसह विविध शाळा, संस्थांचा सहभाग
शहरातील सर्व स्तरातील नागरिक, सेवाभावी संस्था, शाळा,महाविद्यालये यांनी या अभियानात उल्लेखनीय काम केले आणि प्रशासनास सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे आजचा हा राष्ट्रीय पुरस्कार व सन्मान सर्व शहरवासीयांना समर्पित करणे योग्य आहे याच कामाची दखल घेत आज जाहीर झालेल्या या बक्षिसांच्या यादीत मीरा भाईंदर शहराचा समावेश करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या