एक्स्प्लोर

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनस्थळी मंत्री, विरोधक समोरासमोर

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती देऊ आणि योग्य निर्णय घेऊ असं आश्वासन सहकारमंत्र्यांनी यावेळी दिलं. मराठा आंदोलनादरम्यान जे दगावले त्यांना प्रत्येकी 10 लाखांची मदत देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ, असंही त्यांनी सांगितलं.

मुंबई : मागील बारा दिवासांपासून सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आझाद मैदानात उपोषण करत आहेत. तब्बल बारा दिवसांनंतर आज सरकारला जाग आली आहे. विरोधक येण्याआधी आज सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी सुभाष देशमुख आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे समोरासमोर आले.

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती देऊ आणि योग्य निर्णय घेऊ, असं आश्वासन सहकारमंत्र्यांनी यावेळी दिलं. मराठा आंदोलनादरम्यान ज्यांचा मृत्यू झाला त्यांना प्रत्येकी 10 लाखांची मदत देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ, असंही त्यांनी सांगितलं.

'सारथी' (छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था) संस्थेवरून सदानंद मोरे यांना हटवण्याबाबतच्या आंदोलनकर्त्यांच्या मागणीची माहिती मुख्यमंत्र्यांना देणार आहे. आधीच्या सरकारने फसवलं म्हणून आमच्या सरकारवरील विश्वास कमी होत असेल, मात्र आम्ही आरक्षणाबाबत उपाययोजना केल्याची माहितीही सहकारमंत्र्यांनी दिली आहे.

बारा दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे आंदोलकांची प्रकृती खालावत असून एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरक्षणाची मागणी सरकारने लवकर मान्य करावी. आंदोलनात कोणाचंही बरं-वाईट झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला होता.

काय आहेत आंदोलकांच्या मागण्या?

- मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत, - आंदोलकांवरील दंगलीचे गुन्हे मागे घेणे - सारथी संस्थेच्या अध्यक्ष सदानंद मोरे यांचा राजीनामा - मागास आयोगाचा अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबरला असल्याने येत्या अधिवेशनात ठराव मंजूर करुन केंद्राकडे पाठवा

या मागण्या मान्य झाल्या नाही तर 16 नोव्हेंबरपासून राज्यातून मराठा बांधव मुंबईत येऊन मंत्रालय, वर्षा आणि आझाद मैदानात आंदोलनात सहभागी होणार, असंही कार्यकर्त्यांनी सांगितलं.

दरम्यान,  येत्या 26 नोव्हेंबरला मराठा संघटनेचा दुसरा गट मुंबईत आंदोलन करणार आहे. सकल मराठा मोर्चा या आंदोलनात सहभागी होणार नाही. मराठा समाजात फूट पाडण्याचं राजकारण मुख्यमंत्रीच करत असल्याचा आरोपही आंदोलनकांनी यावेळी केला. मात्र येत्या 16 तारखेपासून सकल मराठा क्रांती मोर्चा आझाद मैदानावर संयुक्त आंदोलन करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य खूप सहजपणे मिळाल्याने त्याचे महत्त्व नाही: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य खूप सहजपणे मिळाल्याने त्याचे महत्त्व नाही: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
Embed widget