Jitendra Awhad : "सरकारी जमिनीवरचे अतिक्रमण पाडा असा कोर्टाचा निकाल आहे असे सांगत रेल्वे रुळाच्या थोड्या अंतरावर असलेल्यांना 7 दिवसांत घरे खाली करण्याच्या नोटीस दिल्या आहेत. या नोटिसा सगळ्यांना जातील जे सरकारी जागेवर राहतात. हे सगळे घाबरवण्यासाठी केले जात आहे. घाबरणार कोणीच नाही, जीव देऊ पण वाचवू असा इशारा गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्य रेल्वेला दिला आहे. 


मुंब्रा स्टेशनजवळ मध्य रेल्वेच्या ट्रॅक शेजारी राहणाऱ्या लोकांना नोटीस पाठवून 7 दिवसात घर खाली करण्याचे आदेश मध्य रेल्वेने दिले आहेत. त्याच्याच विरोधात स्थानिक आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज ट्विट केले आहे. या ट्विटमधून मंत्री आव्हाड यांनी मध्य रेल्वेला इशारा दिला आहे.






जितेंद्र आव्हाड यांनी आज मिठागरांच्या जागेवरूनही ट्विट केले आहे. "मिठागरे ही आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगपासून वाचवतात. मुंबईच्या आसपास जी मिठागरे आहेत त्यावर घरे बांधण्याचा प्रस्ताव होता. परंतु, मिठागरांवर कोणत्याही प्रकारची परवानगी म्हाडाकडून आम्ही देणार नाही. माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणं झालं आहे. त्यामुळे यापूढे मिठागरांवर घरे होणार नाहीत, अशी माहिती गृहनिर्माण  मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. 




"मिठागरांची मोकळी जागा घर बांधणीसाठी देऊ नये. मुंबई आणि मुंबईकरांसाठी ते विनाशकारक ठरेल," असे ट्विट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.   


महत्वाच्या बातम्या