एक्स्प्लोर

चंद्रकांत पाटलांकडून राम कदमांची पाठराखण

"राम कदमांनी माफी मागितली आहे, त्यामुळे हा विषय आता संपायला हवा", असं मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं.

मुंबई : बेताल वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या भाजप आमदार राम कदम यांची सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठराखण केली आहे. "राम कदमांनी माफी मागितली आहे, त्यामुळे हा विषय आता संपायला हवा", असं मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं.

"राम कदम यांची पार्श्वभूमी पहिली तर महिलांना मदत करणारी आहे. हजारो महिला त्यांना राखी बांधतात. एखादं वाक्य चुकून गेलं तर त्याचा अर्थ काय होता? आणि जरी चुकीचा अर्थ निघत असेल, तरी त्यांनी आता जाहीर माफी मागितल्यावर विषय संपवायला हवा", असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

"लोकप्रतिनिधींनी बोलतांना काळजी घेतली पाहिजे. तसेच एखाद्या वाक्याचा अर्थ काय होतो हे दाखवतांना माध्यमांनीही विचार केला पाहिजे. माध्यमांनीही त्यांना जे म्हणायचं होतं, तसा अर्थ जाईल हे बघितलं पाहिजे", असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी या प्रकरणाचं खापर माध्यमांवर फोडण्याचा प्रयत्न केला.

मात्र राम कदमांवर कारवाई होणार का? त्यांचं प्रवक्ते पद जाणार का? यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, "कदमांवरील कारवाईबाबतचा निर्णय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे घेतील."

राष्ट्रवादीचं चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र

चंद्रकांत पाटलांच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. "हा विषय भाजपसाठी संपला असेल मात्र आमच्यासाठी हा विषय संपलेला नाही. आम्ही याविषयी जाब विचारणारचं. भाजपने लोकप्रतिनिधींनी कसं वागायल हवं हे शिकवावं. भाजपने राम कदमांवर अजूनही कारवाई का केली नाही?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

चंद्रकांत पाटलांनी प्रसारमाध्यमांवर केलेल्या वक्तव्याचाही समाचारही चित्रा वाघ यांनी घेतला. 'प्रसारमाध्यमांनी कसं वागावं हे चंद्रकांत पाटलांनी त्यांना शिकवू नये", असं चित्रा वाघ म्हणाल्या.

राम कदमांचं वादग्रस्त वक्तव्य "कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लीज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा", असं राम कदम म्हणाले होते. घाटकोपरमध्ये दहीहंडी उत्सवात बोलताना आमदार राम कदम यांनी महिलांविषयक बेताल वक्तव्य केलं होतं. व्हिडीओ- नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील? संबंधित बातम्या
..तर मुलीला पळवून आणण्यास मदत करेन: आमदार राम कदम
राम कदम यांच्यावर काय कारवाई होऊ शकते?
बेताल वक्तव्याप्रकरणी राम कदम यांचा माफीनामा
राम कदमांना 8 दिवसांत उत्तर देण्याचे महिला आयोगाचे आदेश
राम कदमांविरोधात आंदोलन, काँग्रेस महिलांचा आपापसातच वाद
धाडस दाखवा, राम कदमांवर कारवाई करा, उद्धव यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
राम कदम पहिलेच नाहीत, भाजपच्या वाचाळवीरांची यादी मोठी
"मुली पळवण्याचा प्रकार घडला, तर पहिला गुन्हा राम कदमांवर दाखल व्हावा"
पूर्वी म्हणायचे 'टाक घोड्यावर आणि ने वाड्यावर', आव्हाडांचा राम कदमांवर हल्लाबोल
राम कदम माफी मागा नाहीतर, चपलेने हाणू : अॅड. स्वाती नखाते पाटील
 

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget