मुंबई: काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी आज शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला. मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईचे (South Mumbai Lok Sabha Election) माजी खासदार असून ही जागा ठाकरे गटाला जाणार हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी आता शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला. मिलिंद देवरा यांच्यासोबत काँग्रेसच्या दहा माजी नगरसेवकांनाही शिंदे गटामध्ये प्रवेश केला.
मिलिंद देवरा हे काँग्रेसचे माजी खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री आहेत. दक्षिण मुंबईतून ते 2004 आणि 2014 साली निवडून आले आहेत. 2014 आणि 2019 साली त्यांना शिवसेनेच्या अरविंद सावंत यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाला जाण्याची शक्यता आहे. त्याचमुळे राजकीयदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या मिलिंद देवरा यांनी आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या तिकिटावरून देवरा हे दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
मिलींद देवरांसह आज वर्षावर शिंदे गटात कोणाकोणाचा प्रवेश झाला?
- सुशिबेन शहा, राज्य महिला आयोग, माजी अध्यक्ष
- प्रमोद मांद्रेकर , माजी नगरसेवक
- सुनिल नरसाळे, माजी नगरसेवक
- रामवचन मुराई , माजी नगरसेवक
- हंसा मारु, माजी नगरसेवक
- अनिता यादव, माजी नगरसेविका
- रमेश यादव
- गजेंद्र लष्करी, माजी नगरसेवक
- प्रकाश राऊत- जनरल सेक्रेटरी मुंबई कॉग्रेस
- सुशिल व्यास , मारवाडी संमेलन अध्यक्ष
- पुनम कनोजिया
- संजय शहा, डायमंड मर्चंट, जैन सेवा संघ- अध्यक्ष
- दिलीप साकेरिया - मुंबई काॅग्रेस राजस्थानी सेल- अध्यक्ष
- हेमंत बावधनकर- निवृत्त पोलिस अधिकारी
- राजाराम देशमुख, सचिव- मुंबई कॉग्रेस - विश्वस्त सिद्धीविनायक मंदीर
- त्रिंबक तिवारी- सेक्रेटरी, मुंबई कॉग्रेस कमिटी
- कांती मेहता- ऑल इंडीया जैन फेडरेशन अध्यक्ष
- 85 वर्षीय काॅग्रेसचे कार्यकर्ते जवाहरभाई मोतीचंद यांचा शिंदे गटात प्रवेश
दक्षिण मुंबईची राजकीय परिस्थिती काय?
दक्षिण मुंबईत एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. वरळीतून आदित्य ठाकरे (ठाकरे गटाचे आमदार), शिवडी अजय चौधरी (ठाकरे गटाचे आमदार), भायखळा यामिनी जाधव (शिंदे गटाच्या आमदार), मलबार हिल मंगल प्रभात लोढा (भाजप आमदार), कुलाबा राहुल नार्वेकर (भाजप आमदार) आणि मुंबादेवी अमीन पटेल (काँग्रेस आमदार) असं बलाबल सध्या दक्षिण मुंबईत आहे. त्यात आता शिवसेना दोन गटांत विभागली गेली आहे. त्यामुळे मिलिंद देवरांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशाने त्याचा फायदा हा शिवसेना आणि भाजपच्या महायुतीला होणार असं चित्र आहे.
ही बातमी वाचा :