CM Eknath Shinde on Milind Deora : मिलिंद देवरा (Milind Deora) यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश होत असेल, तर त्यांचं स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला मिलिंद देवरा यांच्या पक्षप्रवेशाबाबत काही माहिती नसल्याचं माध्यमांना सांगितलं. मिलिंद देवरा यांच्या पक्षप्रवेशाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, मी याबद्दल ऐकतो आहे, अद्याप मला माहिती नाही. त्यांचा पक्षप्रवेश होत असेल, तर त्यांचा स्वागत करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांवर पलटवार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर देत म्हटलं आहे की, 'हा बाळासाहेबांचा पक्ष तोच आम्ही पुढे नेतोय. बाळासाहेबांचे विचार विकणाऱ्यांनी सत्तेच्या स्फूर्तीसाठी सर्व सोडणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या जनतेशी बेइमानी केली विश्वासघात केला, त्यांना आमच्यावरती टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. ते घाबरलेले डीप क्लीन ड्राईव्हमध्ये येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना क्लीनस्टिक करून टाकेल. जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो, ती संस्था चांगली असते, त्यांच्या विरोधात लागतो, तेव्हा ती संस्था वाईट असते, असे त्याच्यावर आरोप करतात. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांवर आरोप करणं, हे लोकशाहीसाठी घातक आहे, येणाऱ्या निवडणुकीत जनता याला सडेतोड उत्तर देईल. 


तेव्हा पक्षाची गरज होती, अन् श्रीकांत शिंदेंना उमेदवारी मिळाली


घराणेशाहीवर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, तेव्हा पक्षाची गरज होती. एक तरुण चेहरा उच्चशिक्षित चेहरा त्यांना हवा होता. श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीमुळे पक्षाला एक जागा मिळाली, ती जागा आपण जिंकली. राज्यातील विकासाची जी काम सुरू आहेत, ज्या पद्धतीने काम सुरू आहेत, केंद्राचा सपोर्ट राज्याला सपोर्ट मिळतोय, डबल इंजिनसोबत विकासकामांची उद्घाटन होतात.