एक्स्प्लोर

म्हाडा लॉटरी: पगार दीड लाख, तरीही आमदारांना अल्प गटात राखीव घरं

म्हाडाच्या सर्वसामान्यांच्या आणि आरक्षित घरांच्या यादीत, तगडा भत्ता, मोठं उत्पन्न असलेले आमदार-खासदार आहेत.

मुंबई: म्हाडाने आपल्या 819 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 16 सप्टेंबरपासून या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. तर 10 नोव्हेंबरला लॉटरी जाहीर होईल. विविध गटांसाठी म्हाडाने घरं राखीव ठेवली आहेत. त्यामध्ये विविध जाती, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, माजी सैनिक, अंध-अपंग अशा विविध कॅटेगरी आहेत. यामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतं ते म्हणजे आजी-माजी आमदार-खासदारांसाठी राखीव घरं. म्हाडाच्या 819 घरांसाठी लॉटरी, कोणत्या गटासाठी किती घरं? म्हाडाच्या सर्वसामान्यांच्या आणि आरक्षित घरांच्या यादीत, तगडा भत्ता, मोठं उत्पन्न असलेले आमदार-खासदार आहेत. महत्त्वाचं म्हणजे अल्प उत्पन्न गटाची मर्यादा 25 हजार ते  50 हजार रुपयांची असूनही, या गटात आमदारांसाठी 4 राखीव घरं ठेवण्यात आली आहेत. एकीकडे आमदारांचे पगार हे गेल्या वर्षीच सचिवांइतके म्हणजेच सुमारे दीडलाख रुपये करण्यात आले आहेत. त्यामुळे म्हाडाने निदान सरकारच्या त्या विधेयकाकडे पाहून तरी, आमदार-खासदारांना अल्प उत्पन्न गटात राखीव घरं ठेवायला नको होती. पण म्हाडाने सरकारच्या विधेयकाकडे कानाडोळा केल्याचं दिसून येतंय.  एकीकडे मुंबईत लोकांना राहायला घरं नाहीत. अनेक लोक रस्त्यावर, फूटपाथवर किंवा झोपड्यांमध्ये गुजराण करतात. मात्र आमदारांना वेतन,भत्ता, रेल्वे,एसटी, रुग्णालयात सूट असते. शिवाय आमदारांसाठी मुंबईत सुसज्ज आमदार निवास, मंत्र्यांना बंगले, आमदारांच्या अनेक सोसायटी आहेत, मात्र तरीही त्यांना म्हाडाने घरं आरक्षीत केली आहेत. आमदारांसाठी आरक्षित घरं अल्प उत्पन्न गट : कन्नमावर नगर- 3 घरं , किंमत प्रत्येकी 35 लाख चारकोप कांदिवली – 1 घर , किंमत 35 लाख मध्यम उत्पन्न गट : सिद्धार्थनगर, गोरेगाव,  2 घरं – किंमत प्रत्येकी 56 लाख उन्नत नगर गोरेगाव, 1 घर - किंमत प्रत्येकी 41 लाख चारकोप कांदिवली, 1 घर, किंमत 42 लाख चारकोप कांदिवली,1 घर – किंमत 37 लाख उच्च उत्पन्न गट लोअर परेल, 1 घर – किंमत 1 कोटी 43 लाख तुंगा पवई- 4 घरं – किंमत प्रत्येकी 1 कोटी 40 लाख चारकोप कांदिवली, 1 घर –  किंमत 73 लाख शिंपोली कांदिवली, 1 घर - किंमत 75 लाख  म्हाडाच्या घरांसाठी  कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा :
  • अत्यल्प उत्पन्न गट –  25,000
  • अल्प उत्पन्न गट – 25001 ते 50000 रुपये
  • मध्यम उत्पन्न गट – 50,001 ते 75,000 रुपये
  • उच्च उत्पन्न गट – 75,001 पेक्षा जास्त
आमदारांचे पगार (ऑगस्ट 2016 नुसार) आमदार –1 लाख 60 हजार ते 1 लाख 70 हजार राज्यमंत्री –1 लाख 79 हजार ते 1 लाख 99 हजार कॅबिनेट मंत्री – 1 लाख 80 हजार ते 2 लाख संबंधित बातम्या मंत्री, आमदारांच्या पगारात घसघशीत वाढ, वेतनवाढ विधेयक मंजूर म्हाडाच्या 819 घरांसाठी लॉटरी, कोणत्या गटासाठी किती घरं?

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 जुलै 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 जुलै 2026 | शनिवार
टीईटी पेपरफुटी प्रकरण! आग्र्यातून तीन आरोपींना अटक, प्रश्नपत्रिका बाहेर काढण्याच्या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचा संशय
टीईटी पेपरफुटी प्रकरण! आग्र्यातून तीन आरोपींना अटक, प्रश्नपत्रिका बाहेर काढण्याच्या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचा संशय
Maharashtra Rain : राज्यभर पावसाचं धुमशान! मुंबई-ठाण्यासह कोकणात जलमय स्थिती, पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
राज्यभर पावसाचं धुमशान! मुंबई-ठाण्यासह कोकणात जलमय स्थिती, पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
मुसळधार पावसात युवकाचा तोल गेला अन् थेट नदीत पडला, दहिसरच्या मिठी नदीत धक्कादायक घटना 
मुसळधार पावसात युवकाचा तोल गेला अन् थेट नदीत पडला, दहिसरच्या मिठी नदीत धक्कादायक घटना 

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Devendra Fadanvis: CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Jalna Bus Accident News : भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
Embed widget