जालना : बदनापूरचे (जि. जालना) भाजप आमदार नारायण कुचे (Narayan Kuche)  यांचे दक्षिण मुंबईत आलिशान घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. दक्षिण मुंबईच्या ताडदेवमधील साडेसात कोटींचे घर म्हाडाच्या लॉटरीत (Mhada) त्यांनी  साडेसात कोटींचे घर  जिंकले. या घराची अंदाजे किंमत दहा कोटीची आहे. दक्षिण मुंबईतील ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमध्ये दीड हजार स्क्वेअर फुटाचे यंदाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीत सर्वात महागडे घर होते. 


बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न म्हाडाने पूर्ण केले आहे. नारायण कुचे यांना मुंबईत घर घ्यायचे होते त्यासाठी त्यांनी या घरासाठी पाच अर्ज दाखल केले होते. या घरासाठी त्यांनी सर्वसाधारण व लोकप्रतिनिधी गटातून अर्ज दाखल केले होते.  कुचे यांनी क्रीसेंट टॉवरमधील 7 कोटी 52 लाख 61 हजार 631 रुपये किंमतीच्या घरासाठी 2 अर्ज केलेत. त्यांचा एक अर्ज याच टॉवरमधील 5 कोटी 93 लाख रुपये किंमतीच्या घरासाठी होता. पाच पैकी केवळ एक अर्ज लोकप्रतिनिधी प्रवर्गातून करण्यात आला  होता. म्हाडाच्या इमारतीत हक्काचे घर मिळाले आहे.


कोण आहेत नारायण कुचे?


नारायण तिलकचंद कुचे यांना जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघाचे विद्यमान भाजप आमदार आहे.  2 जानेवारी 1972 यांचा जन्म आहे. सुरवातीला छत्रपती संभाजी नगर येथील मुकुंदवाडी चे नगरसेवक राहिलेले नारायण कुचे यांनी 2014 साली जालना जिल्ह्यातील बदनापूर विधासभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती यात त्यांचा विजय झाला. यानंतर 2019 ला देखील ते शिवसेना(ठाकरे )गटाच्या उमेदवाराचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून विजय मिळवला होता.गेली दोन टर्म नारायण कुचे बदनापूर मतदारसंघाच प्रतिनिधित्व करत आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे कट्टर समर्थक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यासोबत अनेकवेळा झालेल्या वादामुळे त्यांचे नाव चर्चेत असते.


केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड वेटिंगवर 


 ताडदेवमधील सात कोटी किमतींच्या घरांसाठीच्या स्पर्धेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड होते. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराडांसोबतच, आमदार नारायण कुचे यांच्याकडून देखील क्रिसेंट टॉवरमधील आलिशान घरासाठी अर्ज केला होता. घरासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) म्हाडाच्या यादीत वेटिंगवर  आहेत.


हे ही वाचा :                                            


Mhada Lottery 2023 :म्हाडाच्या साडेसात कोटींच्या घरासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत वेटिंगवर तर जालन्यातील आमदार कुचे ठरले यशस्वी विजेते