एक्स्प्लोर

'त्या' जागेवर मट्रो कारशेड बनवण्याचा राज्य सरकारला पूर्ण अधिकार, हायकोर्टात पर्यावरणप्रेमीचा हस्तक्षेप अर्ज

कांजूरमार्गच्या भूखंडावर केंद्र सरकार आणि विकासकाचा अधिकारच नाही.मुंबई उच्च न्यायालयात पुढील शुक्रवारी होणार सविस्तर सुनावणी.

मुंबई : कांजूरमार्ग येथील कारशेडच्या जागेवर केंद्र सरकार आणि बांधकाम व्यवसायिक या दोघांचाही अधिकार नसून राज्य सरकारचाच त्यावर पूर्ण अधिकार असल्याचा दावा करत हायकोर्टात शुक्रवारी एक हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आला. पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी मुंबई उच्च न्यायालयात हा अर्ज दाखल केला आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणावर पुढील शुक्रवारी सुनावणी निश्चित केली आहे. 

कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचा तो भूखंड केंद्र सरकारच्या म्हणजेच मिठागर आयुक्तांच्या मालकीचा किंवा कुठल्याही विकासकाचा आहे की, राज्य सरकारचा हे अद्याप निश्चित होणे बाकी आहे. याच प्रकरणात आता पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी मुंबई उच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. साल 1906 मध्ये एकूण 1400 एकर जागा केंद्र सरकारने मिठागरासाठी ताब्यात घेतली होती. साल 1922 मध्ये या जमिनीचे चार भाग करून त्यातील तीन भागांचे सर्व्हेक्षण करून त्यांची नोंदणीही केली. मात्र, चौथा भाग तसाच राहिला, तो भाग आधी 'आर्थर सॉल्ट वर्क' कंपनीनं ताब्यात घेतला मग तो विकासक गरोडिया यांच्याकडे गेला. अशी माहिती प्रस्तावित जागेच्या दस्तेवाजांवरून समोर आल्याचं या अर्जात म्हटलेलं आहे. तसेच मेट्रो कारशेड ही पहिल्या तीन भागांतच उभारण्यात येणार आहे. या जागेवर ताबा सांगणाऱ्या विकासक गरोडियांकडे केवळ जमिनीचा चौथा भाग असल्यामुळे कारशेडच्या जागेशी गरोडिया यांचा काहीही नाही. साल 1906 मध्ये ती जागा केंद्र सरकारनं घेतली होती. मात्र, कालांतरानं भूखंड हा भौगोलिदृष्ट्या समुद्र किनाऱ्यापासून फार दूर गेल्यानं त्याचा उपयोग मिठागरासाठी कधी करण्यातच आला नाही. त्यामुळे या भूखंडावर केंद्र सरकार आणि बांधकाम व्यवसायिक या दोघांचाही अधिकार नसून तिथं राज्य सरकारला कारशेड उभारण्याचा पूर्ण अधिकार असल्याचा दावाही झोरू यांनी आपल्या अर्जातून केला आहे.

दरम्यान कॉन्शियस सिटिझन या संस्थेच्यावतीनं आरेचीच जागा या मेट्रोकारशेडसाठी योग्य होती, असा दावा करत हायकोर्टात एक नवी याचिकाही दाखल झाली आहे. आरे कारशेडच्या कामावरील स्थगिती तात्काळ उठवण्यात यावी ही या याचिकेतील प्रमुख मागणी आहे. आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारणीसाठी सगळ्या प्राधिकरणांची मंजुरी मिळाली होती. मात्र, पर्यावरणाच्या मुद्यावर आता कारशेड कांजूर येथे हलविण्यात येत असून ते बेकायदेशीर आहे. तसेच हा निर्णय निव्वळ राजकीय अहंकारापोटी  घेण्यात आल्याचा आरोपही या याचिकेतून केलेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai BMC news: मुंबई महानगरपालिकेत भाजपचा एक नगरसेवक वाढणार, 'या' कारणामुळे एमआयएमचा नगरसेवक कमी, आज घोषणा होणार
मुंबई महानगरपालिकेत भाजपचा एक नगरसेवक वाढणार, 'या' कारणामुळे एमआयएमचा नगरसेवक कमी, आज घोषणा होणार
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
निष्ठा कोणाला सांगताय? राज ठाकरेंनी तुम्हाला पक्षात घेतलं नाही, विधिमंडळात भास्कर जाधवांचा थेट अतुल भातखळकरांवर हल्लाबोल 
निष्ठा कोणाला सांगताय? राज ठाकरेंनी तुम्हाला पक्षात घेतलं नाही, विधिमंडळात भास्कर जाधवांचा थेट अतुल भातखळकरांवर हल्लाबोल 
मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?
मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Embed widget