मुंबई : अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. यामुळे यावेळेत अप आणि डाउन मेल तसेच एक्सप्रेस गाड्या या अप जलद मार्गावरुन वळवण्यात येणार आहे. तसेच ठाणे ते कल्याण या मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी मध्यरात्री 1.00 ते पहाटे 4 पर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  हार्बर मार्गावर मानखुर्द ते नेरुळ दरम्यान अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. अभियांत्रिकी कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि मानखुर्द दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. 


ठाणे ते कल्याण दरम्यान मेगाब्लॉक


ठाणे-कल्याण पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम सध्या सुरु आहे. त्याचपार्श्वभूमीवर हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान या मार्गावरील  अप आणि डाउन मेल तसेच एक्सप्रेस गाड्या या 6व्या मार्गावरील अप मेल गाड्या कल्याण ते ठाणे दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर 5व्या मार्गावरील डाऊन मेल आणि एक्स्प्रेस गाड्या ठाणे ते कल्याण दरम्यान अप जलद मार्गावरून वळवण्यात येतील. तर या गाड्या त्यांच्या नियोजित ठिकाणी 10 ते 15 मिनिटे उशीरा पोहचणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 


हार्बर मार्गावर मेगब्लॉक


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  ते पनवेल करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा या सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. तर पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करिता सुटणाऱ्या मार्गावर सकाळी 10.37 ते दुपारी 3.45 पर्यंत सेवा या बंद ठेवण्यात येणार आहेत. तर ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि मानखुर्द दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.


हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर लाईन आणि मेन लाईनवरून प्रवास करण्याची परवानगी प्रवाश्यांना देण्यात आली आहे. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणं आवश्यक आहे. यामुळे प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. रविवारी प्रवशांनी रेल्वेचं वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावं असं आवाहन देखील रेल्वेकडून करण्यात आलं आहे. 


हेही वाचा : 


MHADA Lottery : म्हाडासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, पुणे मंडळाच्या 5863 घरांसाठी 30 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ