मुंबई: बोरिवली पोलिसांकडून (Mumbai Police) एका बांगलादेशी एजंटसह 17 बांगलादेशी तरूणांना (Illegal Bangladeshi People) बनावट कागदपत्रांसोबत अटक करण्यात आली आहे. हे सर्व बांगलादेशी नागरिक अवैध मार्गाने भारतामध्ये दाखल होऊन बोरिवली पश्चिमेत येणार असल्याच्या माहिती बोरिवली पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या अनुषंगाने बोरिवली पोलिसांनी सापळा ही कारवाई केली आहे. 


बांगलादेशी एजंट सलमान अयुब खान या आरोपीने मुंबई शहरात मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिकांना अवैध मार्गाने आणले आहे. सर्व बांगलादेशी नागरिकांना या एजंटकडून बोगस पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अजून महत्त्वाची कागदपत्रं बनवण्यात येत होती. हे सर्व बोगस पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड बोरिवली पोलिसांनी जप्त केलं आहे.


सध्या आरोपी बांगलादेशी एजंट सलमान अयुब खान याच्यासोबत 17 बांगलादेशी नागरिकांना बोरिवली पोलिसांनी अटक करून या एजंटचा अजून कोणी साथीदार आहे का आणि मुंबई शहरात अजून किती बांगलादेशी नागरिकांना आणण्यात आलं आहे याचा तपास सुरू केला आहे.