एक्स्प्लोर

मुंबईतील तीनही रेल्वेमार्गांवर आज विशेष मेगाब्लॉक

मुंबई : मुंबईत आज रविवारी तीनही रेल्वेमार्गांवर विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गांवर आज सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वेच्या मुख्य लाइनवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर मेगाब्लॉक असेल, तर हार्बरच्या नेरुळ ते पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते माहीममध्ये अप आणि डाऊन जलद मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मध्य रेल्वेच्या मुख्य लाइनवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. या कालावधीत माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यानची डाऊन स्लोवरील वाहतूक सकाळी 11.27 ते दुपारी 4.27 वाजेपर्यंत डाऊन फास्ट मार्गावरून चालवण्यात येणार आहे. डाऊन स्लो मार्गावरील लोकल गाड्या विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकांवर थांबणार नाहीत. ब्लॉक काळात अप फास्टवरील लोकल सकाळी 11.22 ते दुपारी 3.28 या वेळेत, तर डाऊन फास्ट मार्गावरील गाड्यांना सकाळी 10.48 ते दुपारी 2.54 या वेळेत मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला या स्थानकांमध्ये थांबा देण्यात येणार असल्यामुळे या लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावतील. ब्लॉक काळात लोकल सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावणार आहेत. हार्बर रेल्वे हार्बर मार्गावर नेरुळ ते पनवेल दरम्यान अप आणि डाऊनवर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बरवरील नेरुळ ते पनवेल दरम्यानची अप आणि डाऊनवरील वाहतूक सकाळी 11.01 ते दुपारी 4.26 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. ट्रान्सहार्बरवरील ठाणे ते पनवेलची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सकाळी 11.04 ते दुपारी 4.04 वाजेपर्यंत नेरुळ ते पनवेलमध्ये बंद असणार आहे. पनवेल ते अंधेरीमध्ये हार्बरची वाहतूकही बंद असेल. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सुविधेसाठी सीएसएमटी ते नेरूळ आणि ठाणे ते नेरूळमध्ये विशेष लोकल चालविल्या जाणार आहेत.   पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत सांताक्रूझ ते माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अप आणि डाऊन फास्टवरील वाहतूक सांताक्रूझ ते माहीम अप आणि डाऊन स्लो मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. तसेच काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget