Mumbai Corona Update :  मुंबईतील कोरोनारुग्णांच्या (Mumbai Corona Update) संख्येत आज मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळाली. आज केवळ 29 नवे कोरोनाबाधित आढळले असून काल ही संख्या 48 होती. कमी होणाऱ्या रुग्णसंख्येमुळे पालिका प्रशासनासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.


मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत नवे 29 कोरोनाबाधित आढळले असून 31 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील कमी झाली असून आज ही संख्या 315 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 29 रुग्णांपैकी केवळ दोन रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 28 हजार 495 बेड्सपैकी केवळ 50 बेड सध्या वापरात आहेत.



राज्यात 97 नवे कोरोनाबाधित


आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 97 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर फक्त एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सातारा येथे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मागील 24 तासांत राज्यात 251 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 77,23,005 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.10% एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर 1.82% एवढा आहे.


हे ही वाचा -


 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha