एक्स्प्लोर

महापौर निधीतून मुंबईकरांना मदतीचा हात, गरजू रुग्णांना 25 हजारांपर्यंत मदत मिळणार

मुंबईचे नगरसेवकही मुंबईतील रुग्णांना मदत करण्यासाठी त्यांचे एका महिन्याचे मानधन महापौर निधीला देणार आहेत. मुंबईतील गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी महापौर निधीत भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई : गंभीर आजारपण, मोठ्या शस्त्रक्रिया, महागडे उपचार यांचा खर्च अनेकांना परवडत नाही. मात्र आता मुंबईचे महापौर आणि नगरसेवक मुंबईकरांना मदतीचा हात देणार आहेत. मुंबईतील गरजू रुग्णांना आता महापौर निधीतून थेट 15 ते 25 हजारांची मदत मिळणार आहे. मुंबईचे नगरसेवकही मुंबईतील रुग्णांना मदत करण्यासाठी त्यांचे एका महिन्याचे मानधन महापौर निधीला देणार आहेत. मुंबईतील गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी महापौर निधीत भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईमधील गरजू रुग्णांना महापौर निधीमधून वैद्यकीय आर्थिक मदत केली जाते. या निधीमधून आतापर्यंत  प्रत्येकी पाच हजार रूपये मदत केली जात होती. यात तब्बल आठ वर्षांनी वाढ करून ही रक्कम आता 15 ते 25 हजार रुपये इतकी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापौर निधीमधून 2011 पासून प्रत्येक गरजू रुग्णाला पाच हजार रुपये इतकी मदत केली जात होती. महापौर निधी समितीची बैठक होत नसल्याने आणि महापौर निधीमध्ये वाढ होत नसल्याने या निधीमध्ये गेल्या आठ वर्षात कोणत्याही प्रकारची वाढ झाली नव्हती. महापौर निधीमधून आर्थिक मदत मिळेल या अपेक्षेने मुंबईकर मोठ्या प्रमाणात महापौरांकडे अर्ज करतात. मात्र निधी नसल्याने गरजू रुग्णांना जास्त रक्कम देता येत नव्हती. महापौर निधीमधून देण्यात आलेले पाच हजार रुपयांचे धनादेश अनेक रुग्णालये स्वीकारत नव्हती. यामुळे आज तब्बल आठ वर्षांनी आज महापौर निधी समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत रुग्णांना देण्यात येणारी रक्कम पाच हजार वरून 15 हजार करण्याचा निर्णय घेण्यात आला.  बायपास तसेच मोठ्या शस्त्रक्रियांसाठी 25 हजार रुपये इतकी मदत देण्याचा निर्णयही घेण्यात आला. गरजू रुग्णांना देण्यात येणारी रक्कम वाढवल्यावर महापौर निधीमध्ये वाढ व्हावी म्हणून मुंबईमधील सर्व 227 नगरसेवकांना त्यांचे एक महिन्याचे मानधन महापौर निधीमध्ये जमा करण्याचे आवाहन केले जाणार आहे. तसेच मुंबईच्या नगरसेवकांना दरमहा 25 हजार रुपये इतके मानधन दिले जाते. त्यामधून 56 लाख रुपयांचा निधी जमा केला जाणार आहे. दानशूर व्यक्ती आणि मोठ्या कंपन्यांशीही संपर्क साधला जाणार आहे.  तसेच 'महापौर रजनी'सारखे कार्यक्रम आयोजित करून वर्षभरात पाच कोटी इतकी रक्कम जमा केली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe VIDEO : ज्या महिलांकडून सत्कार, त्यांच्याकडूनच विनयभंगाची तक्रार, स्वतःचे कपडे फाडून घेण्याचा डाव; तुकाराम मुंढेंनी सागितला धक्कादायक किस्सा
ज्या महिलांकडून सत्कार, त्यांच्याकडूनच विनयभंगाची तक्रार, स्वतःचे कपडे फाडून घेण्याचा डाव; तुकाराम मुंढेंनी सागितला धक्कादायक किस्सा
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा राजीनामा, सचिवांकडून पुढील प्रक्रियेला सुरुवात, तक्रारींची चौकशी सुरु झाल्याची माहिती 
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा राजीनामा, सचिवांकडून पुढील प्रक्रियेला सुरुवात, तक्रारींची चौकशी सुरु झाल्याची माहिती 
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget