एक्स्प्लोर

मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरुन तरुणाला घातला लाखोंचा गंडा

पवई पोलिसांनी या प्रकरणी पीडित तरुणाच्या तक्रारीवरुन 32 वर्षीय महिलेच्या विरोधात कलम 420 अंतर्गत 23 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पवई पोलीस या प्रकरणातील तरुणीचा शोध घेत आहेत.

मुंबई : मॅट्रिमोनिअल वेबसाईट्सवरुन लग्नाचं आमिष दाखवत एका तरुणाला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार मुंबईतील पवईमध्ये घडला आहे. जीवनसाथी डॉट कॉमच्या माध्यमातून ही फसवणूक झाली आहे. पीडित तरुणाच्या तक्रारीवरुन पवई पोलिसांनी या प्रकरणी  32 वर्षीय महिलेच्या विरोधात कलम 420 अंतर्गत 23 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पवई पोलीस या प्रकरणातील तरुणीचा शोध घेत आहेत. पीडित तरुण पवई आयआयटी जवळ रहाणारा असून तो एका प्रतिष्ठित कंपनी मध्ये कामाला आहे. गेले काही वर्षे तो लग्नासाठी मुलीच्या शोधात होता. जीवनसाथी डॉट कॉम या लग्न जुळवणाऱ्या वेबसाईट वर त्याने लग्नासाठी रजिस्टर केले होते. इथेच त्याची आरोपी राधिका दीक्षित या तरुणीशी ओळख झाली. आपल्याला हवी तशीच मुलगी असल्याने तरुणाने तिला लग्नाची मागणी घातली. या महिलेने देखील त्याला होकार दिला. या दोघांच्यात ऑनलाइन अथवा मोबाईल वर गेल्या काही महिन्यापासून संभाषण सुरु होते. आरोपी राधिकाने तरुणाला अत्यंत विश्वासात घेऊन काही न काही कारणाने पैशांची मदत मागू लागली. आपले वडील आजारी आहे, आई आजारी आहे अशा विविध कारणांनी तिने तरुणाकडून कधी ऑनलाइन बँक खात्यातून तर कधी चालक पाठवून रोख रक्कम महागडा मोबाईल उकळला. एवढ करुनही राधिका तरुणाला भेटण्यास समोर येत नव्हती. वारंवार भेटण्याची विनंती केल्यानंतर अखेर राधिका तरुणाला भेटण्यास समोर आली आणि तरुणाला धक्काच बसला. कारण प्रोफाइल फोटोमध्ये असेलली तरुणी वेगळी होती तिचे नावसुद्धा वेगळे होते. या तरुणीकडे तरुणाने पैसे मागितले असता तिने देण्यास नकार दिला. अखेर याबाबत तरुणाने पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Embed widget