Mard doctor Organization : निवासी डॉक्टरांकडून संप मागे घेत असल्याची घोषणा रविवारी (दि.25) करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच निवासी डॉक्टर त्वरीत कामावर रुजू होणार आहेत. राज्य सरकारकडून १० हजार रुपये विद्या वेतन वाढवल्यानंतर निवासी डॉक्टरांकडून संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सेंट्रल मार्डने वेतन वाढवल्याने राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
निवासी डॉक्टरांचा हा अभूतपूर्व विजय झाला
आम्ही महाराष्ट्र राज्यातील सर्व रहिवासी आणि मार्ड प्रतिनिधींचे आभार मानतो. निवासी डॉक्टरांच्या संपात सक्रिय सहभाग घेतला आणि एकता दाखवली. त्यामुळेच निवासी डॉक्टरांचा हा अभूतपूर्व विजय झाला. निर्णायक उपाययोजना केल्याबद्दल आम्ही केंद्रीय मार्डचे आभारी आहोत. केंद्रीतील मार्ड आणि राज्यातील निवसी डॉक्टरांना दिलेली आश्वासने पूर्ण करा, असे महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने म्हणजेच सेंट्रल मार्डने पत्राद्वारे म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांचे आभार
आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार ,मंत्री हसन मुश्रीफ , एमईडीडीचे सचिव दिनेश वाघमारे , आयुक्त जीव निवतकर , DMER चे संचालक डॉ दिलीप म्हैसेकर यांचे आभार मानतो, असे मार्ड या डॉक्टरांच्या संघटनेने म्हटलय. वैद्यकीय शिक्षण मंत्रालय व संबंधित पदाधिकाऱ्यांनी तत्परतेने काम करावी आणि मागण्या अधिकृतपणे पूर्ण झाल्याची खात्री करा, असेही मार्डने नमूद केले.
आश्वासन पूर्ण केले नसल्याने दिली होती संपाची हाक
सरकारने बैठीत दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याने सेंट्रल मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेकडून पुन्हा एकदा संपाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे 22 फेब्रुवारीपासून सायंकाळी 5 वाजल्यापासून विविध मागण्यांसाठी राज्यभर जाणार डॉक्टर संपावर जाणार आहेत. यापूर्वी 7 फेब्रुवारीला संपाची हाक दिली होती, त्यावेळी उपमुख्यमंत्री यांनी डॉक्टरांसोबत बैठक घेत त्यांचा मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.
काय आहेत निवासी डॉक्टरांच्या मागण्या
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आणि एमबीबीएसची पदवी पूर्ण केलेल्या डॉक्टरांना पदव्युत्तर शिक्षण घेण्याची इच्छा असते. शिवाय पदव्युत्तर शिक्षणही आवडत्या विषयात घेण्याचा डॉक्टरांचा कल असतो. राज्यात दरवर्षी 4 हजारांच्या आसपास डॉक्टर पदव्युत्तर शिक्षण घेतात. मात्र, शिक्षण घेताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विद्यावेतन, वसतिगृहातील व्यवस्था, सुरक्षा याबाबत डॉक्टरांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. डॉक्टरांच्या समस्या अनेकदा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. मात्र, सरकारकडून त्यांच्या समस्यांवर कोणताच तोगडा काढण्यात आलेला नाही.
इतर महत्वाच्या बातम्या