मुंबई : एल्फिन्स्टन पुलावरच्या चेंगरीचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या वरळीतील मयुरेश हळदणकरच्या कुटुंबियांना मदतीसाठी अनेकजण आता पुढे येताना दिसत आहेत. मराठवाडा मित्र परिवाराच्या व्हॉट्सअॅप ग्रुपनेही हळदणकर कुटुंबियांना आर्थिक मदत दिली आहे.


नवी मुंबईतील मराठवाडा मित्र परिवाराच्या व्हॉट्सअॅप ग्रुपने 75 हजार 900 रुपयांची मदत मयुरेशच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केली.

एकुलता आधारस्तंभ गमावला

29 सप्टेंबरला एल्फिन्स्टन स्टेशनवरील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत हळदणकर कुटुंबीयांनी आपल्या काळजाचा तुकडा गमावला.

वरळीच्या 80 नंबरच्या बीडीडी चाळीत छोट्याशा खोलीत मयुरेश हळदणकर कुटुंबासोबत राहायचा.

घरात तीन-चार लोक मोठ्या मुश्किलीनं झोपतील एवढीच जागा. वडिलांना नोकरी नाही. आईचं सततचं आजारपण. हळदणकर कुटुंबाचा गाडा एकट्या मयुरेशच्या छोट्या खांद्यावर होता.

मयुरेशनंतर आता कुटुंबाची जबाबदारी त्याच्या बहिणीवर आली आहे. तिला सरकारी नोकरी मिळावी अशी मागणी आता हळदणकर कुटुंब आणि समस्त वरळीकर करत आहेत.

संबंधित बातम्या :

चेंगराचेंगरीत मुलगा गमावलेल्या कुटुंबाच्या मदतीसाठी स्तुत्य उपक्रम

मुंबईकरांनो, मयुरेशसाठी 'इथला' एक तरी वडा-पाव विकत घ्या!

एलफिन्स्टन दुर्घटना : हळदणकर कुटुंबियांना शिवसेना आमदाराकडून मदत.