माफियांच्या पैशांवर शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी : किरीट सोमय्या
एबीपी माझा वेब टीम | 14 Oct 2017 05:52 PM (IST)
माफियागिरीतून आलेल्या पैशांच्या जोरावरच शिवसेनेनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहा नगरसेवक फोडले, असा घणाघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

मुंबई : माफियागिरीतून आलेल्या पैशांच्या जोरावरच शिवसेनेनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहा नगरसेवक फोडले, असा घणाघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. भांडुप पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पराभवानंतर शिवसेनेनं तात्काळ एक भन्नाट चाल खेळत मनसेच्या तब्बल 6 नगरसेवकांना फोडलं. या फोडाफोडीनंतर भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. भांडुपमधला पराभव शिवसेना पचवू शकली नाही, म्हणूनच शिवसेनेनं फोडाफोडीचं राजकारण सुरु केला असल्याचा, दावाही सोमय्यांनी केला आहे. तसेच ज्या भांडुपमध्ये कोकणवासिय मराठी मतदार मोठ्या संख्येने आहेत, त्याच वॉर्डात शिवसेनेची पिछेहाट होत आहे. यावरुन मुंबईकर आणि कोकणवासिय भाजपच्या सोबत असल्याचंही ते यावेळी म्हणाले. तसेच भाजपने कोणताही उमेदवार आयात केला नाही. उलट भांडुपमध्ये निवडून आलेल्या उमेदवाराचे वडील शिवसेनेचे नगरसेवक आहेत. ते संपूर्ण कुटुंब राजकारणात सक्रिय आहे. त्यांच्या सुनेला राजकारणात यायची इच्छा होती. आम्ही फक्त त्यांचं स्वागत केलं, असं सांगून उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंच्या आरोपांना उत्तर दिलं. तसेच महापालिका वांद्र्याच्या सुप्रीमोंच्या हातातून जाण्याची भिती वाटत असल्यानं खरेदी विक्री महासंघाचं नेतृत्व सुरु केला असल्याचा टोलाही किरीट सोमय्या यांनी लगावला. काय म्हणाले किरीट सोमय्या? संबंधित बातम्याघोडेबाजारी केल्याचा आरोप गाढवांनी करु नये : उद्धव ठाकरेपूर्वाश्रमीचे शिवसैनिक पुन्हा शिवसेनेत : अनिल परब7 नगरसेवक, 13 आमदार ते मनसेकडे उरलेला एकटा नगरसेवकपहिल्या मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेनेची तात्काळ दुसरी खेळी!शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबतमनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण?मॉकड्रीलचं कारण देत मुंबई महापालिकेच सर्व दरवाजे बंद!करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोपदगाफटका योग्य नाही, नगरसेवकांवर राज ठाकरे भडकले‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हानमोठे दावे करणार्यांचे पोट फाडून भाजपचा विजय : आशिष शेलारभांडुप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, सत्ता समीकरणं कशी बदलणार?मुंबई वॉर्ड क्रमांक 116 पोटनिवडणूक : भाजपच्या जागृती पाटील विजयीकरोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोपशिवसेनेला पश्चाताप, जागृती पाटील सेनेत येणार होत्या!फोडाफोडी आणि थैलीशाहीचे राजकारण नेहमीच यशस्वी होत नाही: शिवसेना