काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार यांची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 14 Oct 2017 04:51 PM (IST)
महादेव शेलार मुलुंडच्या एलबीएस रोडवरील बिलवा कुंजमध्ये ते राहत होते.
मुंबई : काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार यांनी आत्महत्या केली. राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली. महादेव शेलार यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मुलुंडमधील राहत्या घरात महादेव शेलार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलुंडच्या एलबीएस रोडवरील बिलवा कुंजमध्ये ते राहत होते. या घटनेनंतर मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात घेऊन गेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनसाठी महादेव शेलार यांचा मृतदेह नेण्यात येणार आहे.