एक्स्प्लोर

मराठा आरक्षण: आज सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक

आज विधानभवनात होणाऱ्या बैठकीकडे साऱ्या महराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

मुंबई: मराठा आरक्षणप्रश्नी तोडगा काढण्यासाठी आज विधानभवनात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक होणार आहे. परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी अद्यापही राज्यभरात विविध ठिकाणी मराठा समाजाची आंदोलने सुरु आहेत. त्यामुळे आज विधानभवनात होणाऱ्या बैठकीकडे साऱ्या महराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. उपसमितीची मागासवर्गीय आयोगाला भेट मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या उपसमितीनं मागासवर्गीय आयोगाची काल भेट घेतली. या समितीने अहवाल लवकरात लवकर दिला जावा अशी मागणी केली. चंद्रकांत पाटील यांची माहिती ज्या मागास आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार तो अहवाल लवकर यावा यासाठी मागास आयोगाच्या अध्यक्षांना आम्ही पत्र दिले. हा रिपोर्ट लवकर यावा अशी समाजाची मानसिकता आहे असे आम्ही त्यांना सांगितले, असं उपसमितीचे प्रमुख आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. आयोगाला आज आम्ही एक विनंती पत्र दिले. 31 जुलैपर्यंत सर्व्हे पूर्ण होणार आहे. आतापर्यत 1 लाख 87 हजार मराठा समाजची निवेदन आली आहेत. जलद काम करण्यासाठी सरकार आवश्यक ती मदत करेल. त्यांना आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग आणि सुविधा सरकार देणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवसेना नेत्यांना डावललं? (दरम्यान मागासवर्गीय आयोगासोबतच्या बैठकीत चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, आशिष शेलारांसह अनेक भाजप नेते उपस्थित होते मात्र उपसमितीतील शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेंना डावलल्याची चर्चा रंगली होती. सरकार आरक्षणाचा तातडीने विचार करेल: राणे हिंसक आंदोलन थांबल्यास सरकार मराठा आरक्षणाबाबत तातडीने विचार  करेल, असं मत खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केलंय. सरकारनं मराठा समाजाला विश्वास बसेल अशी भूमिका घ्यावी असं मतही राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण मुख्यमंत्री आणि मराठा समाजाच्या नेत्यांना भेटलो असून, सकारात्मक भूमिका घेतल्यास दोन दिवसांत त्यांची भेट घडवून आणणार असल्याचंही राणे म्हणाले. माझा कट्ट्यावर चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट आषाढी वारीत साप सोडण्याबाबतचं संभाषण आमच्या हाती असल्याचा गौप्यस्फोट महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझा कट्टावर केला. तसं संभाषण करणाऱ्यांची आणि मराठा आंदोलनात हिंसा भडकवणाऱ्यांची नावं आमच्या हातात असल्याचंही पाटील म्हणाले. सरकारकडून त्यांच्याविरोधात कारवाईला सुरुवात झाल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता सरकार यावर काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.  त्याचबरोबर याच सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळेल असा दावाही त्यांनी माझा कट्टावर केलाय. मुख्यमंत्री बदलणार नाही: गडकरी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा भाजपमध्ये नसल्याचं केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. संपूर्ण पक्ष देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असं गडकरी म्हणाले. ते नागपुरात बोलत होते. आर्थिक निकषावर आरक्षण द्या: राज ठाकरे जातीवर नाही तर आर्थिक निकषांवर आरक्षण दिलं पाहिजे. आताचं सरकार आणि मागचं सरकार हे तुमच्या भावनांशी खेळ खेळत आहे. अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली. पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यात बोलताना राज यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळं समाजात विष कालवलं गेलं. स्थानिकांना जर रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या तर आरक्षणाची गरजच राहणार नाही, असंही राज ठाकरे म्हणालेत. संबंधित बातम्या  मुख्यमंत्री बदलावर नितीन गडकरी म्हणतात...   आर्थिक निकषावर आरक्षण द्या: राज ठाकरे  माझा कट्ट्यावर चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट   

महत्त्वाच्या बातम्या

व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Embed widget