Maratha And OBC Reservation: मुंबई : मराठा (Maratha Reservation) आणि ओबीसी समाज (OBC Samaj) आझाद मैदानासाठी (Mumbai Azad Maidan) आग्रही आहेत. दोन्ही समन्वयकांकडून मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) परवानगीसाठी पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे आंदोलनासाठी मुंबई पोलिसांकडून परवानगी कोणाला मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, 20 जानेवारीला मराठा (Maratha Samaj) आणि ओबीसी समाजाचं आंदोलन होणार आहे. दोन्ही समाजाच्या समन्वयकांनी आझाद मैदानात आपल्याला परवानगी मिळावी, यासाठी पत्र व्यवहार केलेला आहे. दोन्ही समाजाचे समन्वयक आझाद मैदान आंदोलनसाठी सोयीस्कर असल्यामुळे आग्रही आहेत. त्यामुळे आता आझाद मैदान पोलिसांकडे दोन्ही समाजाचे पत्र आंदोलनासाठी परवानगी मागण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे आता पोलीस परवानगी कोणाला देतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी मुंबईतील तीन मैदानांची परवानगी मागितली
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी मुंबईत तिन मैदानांच्या परवानगीसाठी शिष्टमंडळानं परवानगी मागितली आहे. मुंबई पोलिसांकडे मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळानं आंदोलनासाठी पत्र व्यवहार केला आहे. यामध्ये आझाद मैदान, छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान आणि बीकेसी वांद्रे मैदानासाठी परवानगी मागण्यात आली आहे. 20 जानेवारीला जरांगे यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळानं मुंबईत येऊन काही मैदानांची पाहणी करत मुंबईतील समन्वय समितीसोबतही चर्चा केली आहे. त्यात आता काहीच दिवस शिल्लक असल्यानं मुंबईतील सकल मराठा समाजाचे समन्वयक हे मनोज जरंगे पाटील यांना भेटण्यासाठी जालन्याला गेले होते.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आपल्या सर्व समन्वयकांना तयारी करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर परवानगीसाठी पत्रव्यवहार आणि इतर तयारी देखील आता मुंबईतील समन्वयक करत आहेत.
पाहा व्हिडीओ : OBC Maratha Samaj : मराठा आणि ओबीसी समाज आझाद मैदानासाठी आग्रही, 20 जानेवारीला होणार आंदोलन
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मोठी बातमी! यापुढे आता सरकारशी चर्चा बंद, मनोज जरांगेंची मोठी घोषणा