BJP Leader Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या ठाण्यात मनसुख हिरण यांच्या घरी भेट दिली. हिरण यांची अँटेलिया स्फोटक प्रकरणानंतर हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनी मनसुख हिरण यांना यातना दिल्या असल्याचा आरोप सोमय्यांनी बोलताना केला. तसेच, पुढे बोलताना उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) माफिया पोलिसांनीच हिरण यांची हत्या केल्याचा घणाघाती आरोपही सोमय्यांनी केला आहे. संजय राऊत म्हणजे, विषय बदलण्यासाठी लावलेला उद्धव ठाकरेंचा भोंगा, असं म्हणत किरीट सोमय्यांनी संजय राऊतांनाही लक्ष्य केलं आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या बोलताना म्हणाले की, "मनसुख हिरण कुटुंबीयांच्या वेदना अजून कमी होत नाहीत. ज्या यातना त्यांना उद्धव ठाकरे यांच्या उद्धट सरकारमुळं सहन कराव्या लागल्यात, परवा दिलासा एवढाच की, एनआयचं महत्त्वाचं प्रतिज्ञापत्र फाईल करण्यात आल्यामुळे त्यांना धीर मिळाला आहे. आज त्यांच्या कुटुंबीयांशी विस्तृत चर्चा केली. माझ्यासोबत इतरही भाजप नेते उपस्थित होते. पुढच्या आठवड्यात मी स्वतः एनआयएची भेट घेणार आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "हिरण यांच्या कुटुंबाला अजून दोन दिवस आठवत आहेत, ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या माफिया पोलिसांनी मनसुख हिरण हत्यारे, वसुलीखोर असं चित्र उभं केलं होतं. उद्धव ठाकरे सरकारला यासाठी माफी मागावीच लागणार."
मनसुख हिरण हत्याकांडामागे हेतू वसुलीचाच : किरीट सोमय्या
"उद्धव ठाकरे तुम्ही दोन माफियांना पोलीस दलात बैकायदेशीर पद्धतीनं नियुक्त केलं आहे. तसेच, या दोघांना 100 कोटींचं टार्गेट तुमच्या सरकारनं दिलं आहे. त्यामुळे हे दोघेजण निर्दोष लोकांच्या सुपाऱ्या घेऊन आज या कुटुंबाला अनाथ आणि निराधार करण्याचं पाप उद्धव ठाकरे सरकारनं केलं आहे. मी एनआयएला भेटून हा तपास पुढे चालावा. या दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या त्याच्या फाईल्स शोधाव्यात, यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची विनंती करणार आहे.", असं सोमय्या म्हणाले. "आज हे सिद्ध झालं आहे की, मनसुख हिरण हत्याकांडामागे हेतू वसुलीचाच होता. या वसुलीचं काम उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री कार्यालयानं अनिल देशमुखांना दिलं होतं. यातूनच मनसुख हिरण यांची हत्या झाली आहे.", असंही ते म्हणाले. तसेच, संजय राऊत म्हणजे, विषय बदलण्यासाठी लावलेला उद्धव ठाकरेंचा भोंगा, असंही किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Sanjay Raut : भोंग्यांचा मुद्दा संपलाय, आता महागाईवर बोला; संजय राऊतांचा हल्लाबोल