Mumbai Local Power Block : मुंबईकरांना मेगा ब्लॉकसोबतच पॉवर ब्लॉकचाही सामना करावा लागणार आहे. तुम्ही जर एक्सप्रेसनं किंवा लोकलनं (Mumbai Local) कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा आणि आधी ही बातमी वाचा. आधीच मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अशातच आता मध्य रेल्वेकडून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेकडून शनिवारी 7 मे आणि रविवारी 8 मे रोजी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. कसारा येथे पादचारी पुलाचं गर्डर काम सुरू करण्यासाठी हा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी गाड्यांच्या वेळांत काही बदल करण्यात आले आहेत.
मध्य रेल्वे मुंबई विभाग कसारा स्थानकावर 6 मीटर पादचारी पुल बांधणार असून तीन टप्प्यात गर्डर लॉंच करण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक चालवणार आहे. यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. जाणून घ्या सविस्तर...
1 ब्लॉक : शनिवार 7 मे रोजी दुपारी 2.25 ते 3.35 पर्यंत आसनगाव ते कसारा दरम्यान अप मार्गावर
उपनगरीय गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/रद्दीकरण आणि ब्लॉक कालावधीत गाड्यांचे परीचालन
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11.42 आणि 12.30 वाजता कसार्यासाठी सुटणारी लोकल आसनगाव येथे शॉर्ट टर्मिनेट होईल आणि आसनगाव - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस धिमी लोकल आसनगावहून दुपारी 1.48 आणि दुपारी 2.50 वाजता निघेल.
• कसारा येथून दुपारी 2.42 आणि दुपारी 3.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणारी लोकल रद्द राहील.
• आसनगाव ते कसारा दरम्यानची उपनगरीय सेवा डाऊन दिशेला सकाळी 11.55 ते दुपारी 3.10 पर्यंत आणि अप दिशेला दुपारी 1.30 ते सायंकाळी 4.15 पर्यंत बंद राहील.
• ब्लॉक दरम्यान, कसारा येथून सुटणाऱ्या आणि संपणाऱ्या गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून चालवण्यात येतील, अप मेल/एक्स्प्रेस गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून चालवण्यात येतील आणि डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून चालवण्यात येतील.
अप एक्सप्रेस गाड्यांचे नियमन
• 15018 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आणि 12335 भागलपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस इगतपुरी स्थानकावर नियमित केल्या जातील आणि वेळेपेक्षा 15 ते 20 मिनिटं उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील.
2 ब्लॉक : शनिवार/रविवार रोजी मध्यरात्री 3.35 ते पहाटे 4.55 पर्यंत आसनगाव आणि कसारा दरम्यान अप आणि डाउन मार्गावर
उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक
• कसारा येथून पहाटे 4.59 वाजता सुटणारी अप लोकल पहाटे 5.15 वाजता सुटेल.
अप एक्सप्रेस गाड्यांचे नियमन
• 12112 अमरावती - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस इगतपुरी येथे 45 मिनिटं नियमित केली जाईल, 17058 सिकंदराबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस देवगिरी एक्स्प्रेस 15 मिनिटं उशीरानं असेल आणि दोन्ही गाड्या दादरला शॉर्ट टर्मिनेट होतील.
• 12106 गोंदिया - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विदर्भ एक्स्प्रेस इगतपुरी येथे नियमित केली जाईल आणि तिच्या नियोजित वेळेने 1 तास उशिरानं गंतव्यस्थानी पोहोचेल.
• 12618 हजरत निजामुद्दीन - एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस रोहा येथे वेळेपेक्षा 15 मिनिटं उशिरानं पोहोचेल.
3 ब्लॉक : रविवार 8 मे रोजी रोजी सकाळी 10.50 ते दुपारी 12.20 पर्यंत डाउन मार्गावर आणि दुपारी 2.50 ते दुपारी 3.50 पर्यंत आसनगाव आणि कसारा दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
उपनगरीय गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/रद्दीकरण
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.34 आणि दुपारी 12.30 वाजता कसार्यासाठी सुटणारी लोकल रद्द केली जाईल.
• कसारा येथून दुपारी 12.19 आणि 3.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणारी लोकल कसारा ते ठाणे दरम्यान रद्द राहिल.
अप एक्सप्रेस गाड्यांचे नियमन
• 15018 गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आणि 12742 पाटणा - वास्को एक्स्प्रेस इगतपुरी स्टेशनवर नियमित केल्या जातील आणि वेळापत्रकापेक्षा 35 ते 40 मिनिटं उशिरानं गंतव्यस्थानी पोहोचतील.
डाउन एक्सप्रेस गाड्यांचे नियमन
• 12617 एर्नाकुलम -हजरत निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस खर्डी स्टेशनवर 30 ते 35 मिनिटं नियमित केली जाईल.
• 12188 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -जबलपूर गरीब रथ एक्स्प्रेस 25 ते 30 मिनिटे आटगाव स्थानकावर नियमित केली जाईल.
• 11071 लोकमान्य टिळक टर्मिनस - वाराणसी कामायनी एक्सप्रेस खडवली स्थानकावर 15 ते 20 मिनिटं नियमित केली जाईल.
या विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात येत आहे. पायाभूत सुविधांच्या सुधारणांसाठी हे विशेष ब्लॉक आवश्यक आहेत. त्यामुळे या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनानं दिलगीरीही व्यक्त केली आहे.
(सदर माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं जारी केलेल्या पत्रकाच्या आधारे देण्यात आली आहे.)