मुंबई : मनोज जरांगे (Manoj Jarange SIT inquiry ) यांच्या हिंसक वक्तव्याची SIT मार्फत चौकशी करण्याची घोषणा केल्यानंतर, राज्य सरकारने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपल्या पोलिसांना मारायचं आणि आपण चूप राहायचं का, यामागील सर्व षडयंत्र बाहेर येईल, असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर विधानसभेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Vidhan Sabha) यांनी आपला मुद्दा मांडला.

  


देवेंद्र फडणवीस म्हणाले, " मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची SIT मार्फत चौकशी करण्याचे आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. त्याचे निश्चित पालन होईल. मला याबाबत या विषयात माझी बोलायची इच्छा नव्हती. पण इथे विषय आला आहे, त्यामुळे बोलायला हवं.  ⁠मराठा सामाजच्या संदर्भात मी काय केलं हे मराठा समाजाला आणि महाराष्ट्राला माहीत आहे. ⁠मी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिल ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात टिकवलं.  ⁠सारथीला निधी शिष्यवृत्ती दिली.  ⁠कर्ज दिले. ⁠मराठा सामाज्याच्या संदर्भात मला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही.  ⁠जरांगे पाटील माझ्यावर बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभे राहिले  त्यांच्या (जरांगेंच्या) नाही. 


कोणी कोणाची आई बहीण काढेल, आपण छत्रपत शिवाजी महाराज यांचं नाव सांगतो. कल्याणच्या सुभेदाराच्या सूनेला वापस पाठवणारे आमचे छत्रपती. छत्रपतींचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या आया-बहिणी काढायच्या? खरं तर माझी त्यांच्याबाबत तक्रारच नाही. पण या सर्वामागे कोण आहे, हे शोधायलाच हवं. 


जो महत्त्वाचा मुद्दा आहे, तो आशिष शेलरांनी नंतर मांडला. दगडफेक करणारे सांगतात की आम्हाला कोणी सांगितलं. हा आपला महाराष्ट्र नाही. जालन्यात लाठीचार्जच्या आधी मनोज जरांगे यांना परत कोणी आणलं? ⁠त्यांना घरी कोण भेटलं?  ⁠आरोपी संगत आहे की दगडफेक करायला कोणी सांगितले ⁠पोलीस आपले नाहीत का? हे षडयंत्र बाहेर येत आहे"


 समाजाला विघटीत करण्याचा प्रयत्न होत असेल,  ⁠त्यांना पैसे कोण देतेय? ⁠त्यांना मदत कोण करतंय? ⁠हे सर्व बाहेर येईल. जर आय-माय काढणार असेल तर योग्य नाही. ⁠ तुमच्या बदल जर कोणी बोलले तर तुमच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस राहतील.⁠जरांगे पाटील यांच्या संदर्भात मला घेणंदेणं नाही.  ⁠मात्र त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे शोधलं जाईल. छत्रपती संभाजीनगर याठिकाणी वॉर रुम कोणी सुरु केली, ⁠याची सखोल चौकशी होईल.


एसआयटी चौकशीचे करा, राहुल नार्वेकरांचे आदेश 


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगेंच्या आरोपांची चौकशी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले गृह विभागाला दिले. हिंसा अथवा हिसंक वक्तव्य याला लोकशाहीत स्थान नाही. यासाठी योग्य उपाय योजना करण्याची जबाबदारी शासनाची आहे. याचं गांभीर्य लक्षात घेत शासनाने याची सखोल एसआयटी चौकशी करावी, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.  


Devendra Fadnavis on Manoj Jarange : षडयंत्र बाहेर काढू,  देवेंद्र फडणवीस आक्रमक



संबंधित बातम्या 


Maratha Reservation : जरांगेंच्या आंदोलनावर एसआयटी चौकशीचे आदेश, विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी