Manoj Jarange Maratha Reservatio LIVE: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आणि एकनाथ शिंदेंची महत्त्वाची बैठक
Manoj Jarange Patil in Mumbai: मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मुंबईत कालपासून जोरदार पाऊस असल्याने मराठा आंदोलकांची गैरसोय
पार्श्वभूमी
Manoj Jarange Patil in Mumbai LIVE Updates: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आणि सगेसोयऱ्यांचे आरक्षण मिळावे, ही मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ...More
जरांगे
मी येत असताना माझ्या अंगावर फुले उधळण्यात आले त्यामुळे त्याचा कलर माझ्या मागे लागला होता
त्याच्या पिवळा कलर लागला होता
पण ते परळी वल्याना वाटले पिवळा झाला आहे पण परळी वल्याना मी नंतर बघतो
परळीकरना दोघाना मी जेलात टाकले आहे या पुढे मी गेल्यावर
बघेल
कपडे भरले आहे असे कोण म्हणाले मला
त्यांचा स्क्रीन शॉट काढून ठेवा
तुमच्या नेत्याला लाव,
उद्धव ठाकरेंचा फोन आला होता
काळजी घ्या आम्ही तुमच्या मागण्यांच्या सोबत आहोत
मुबई आणि महाराष्ट्रात देखील तुमच्या सोबत आहोत
सरकारने विचार करायला पाहिजे असं ते म्हणाले
उद्धव ठाकरेंना आश्चर्य वाटलं की राज्याच्या कानाकोपऱ्यातून एवढ्या मोठ्या संख्येने आले
मराठा आंदोलनाला पुढील मुदत वाढवून देण्यासाठी मराठा आंदोलकांचा मुंबई पोलिसांना अर्ज
उद्याही आंदोलनाला परवानगी देण्यासाठी मुंबई पोलिस सकारात्मक
आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांची रोज परवानगी घ्यावी लागणार
उद्यासाठी आंदोलनाला परवानगी देण्यासाठी मुंबई पोलिस सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती
Ac - मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी म्हणून जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत.याच आंदोलनात हजारो समाज बांधव राज्यभरातून दाखल होत आहेत.काल आझाद मैदान परिसरातील खाऊ गल्ली सही तर हॉटेल बंद ठेवण्यात आले होते.त्यानंतर आता याच आंदोलनातील समाज बांधवांना जेवणाची सोय व्हावी म्हणून बीड मधील महिलांनी भाकरी,धपाटे,पोळ्या यासह लोणच,चटणी असे पदार्थ थेट बीडच्या घाटनांदुर सह अंबाजोगाई,केज येथून मुंबईला पाठवण्यात येणार आहेत.यावेळी महिलांनी त्यांच्या कुटुंबीयांना आरक्षणाचा गुलाल उधळल्याशिवाय परत येऊ नका असे सांगितले आहे.याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी..
Anc: मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची मुंबईत अन्नाविना गैरसोय होतेय. हीच बाब लक्षात घेऊन बीड मधील गाव खेड्यातील मराठा समाज बांधवांनी पुढाकार घेतलाय. बीडच्या साक्षाळ पिंपरी गावातून मराठा बांधवांसाठी दहा हजार भाकरी, ठेचा, चटणी आणि लोणचं मुंबईच्या दिशेने पाठविले गेले आहे. आरक्षणाचा प्रश्न निकाली काढूनच समाज बांधवांनी गावाकडे परतावं. असा संदेश गाव खेड्यातील मराठा समाज बांधवांनी मुंबईला पाठवलाय.. बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भाकरी आणि ठेचा मुंबईला पाठविला जातोय.
नवी मुंबई -
TT with विनोद पोखरकर - मराठा समन्वयक.
नवी मुंबईत मोठ्या संख्येने मराठा आंदोलक रहायला आल्याने त्यांना मुंबईत जाण्यासाठी ट्रेन बरोबर बस उपलब्ध करून द्या.
नवी मुंबई परिवहन , बेस्ट ,
एस टी गाड्या सोडण्याची विनंती
वाशीतून आझाद मैदान पर्यंत बस सोडा..
आंदोलकांना जेवण पुरविण्यासाठी शहरातील रहिवाशांना चटणी - भाकरी देण्याचे आवाह
मराठा आंदोलकांना जेवण व पाणी मिळू नये यासाठी हॉटेल्स बंद करण्यात आल्याच्या बातम्या आहेत. पिण्याचे पाणी सुद्धा त्यांना मिळू नये यासाठी डावपेच केले जात आहेत.
लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलन करण्याचा व मते मांडण्याचा अधिकार आहे असे एकीकडे म्हणायचे व दुसरीकडे अन्न आणि पाण्यापासून आंदोलकांची कोंडी करायची. सत्ताधाऱ्यांची ही कृती लोकशाही विरोधी तर आहेच शिवाय ती अमानवीय कृती सुद्धा आहे.
मागण्यांबद्दल वेगवेगळी मते असू शकतात, मात्र मानवते बद्दल वेगळे मत असू शकत नाही.आंदोलनासाठी गाव गाड्यातून आलेल्या शेतकरी पोरांना जेवायला मिळू नये, पिण्याला पाणी सुद्धा मिळू नये, अशा प्रकारे जर कोणी प्रयत्न करत असतील तर ते संपूर्णपणे चुकीचे आहे.
मानवतेचे दर्शन घडवित, किसान सभेच्या लॉन्ग मार्चच्या वेळी शेतकऱ्यांचे ज्या उदात्तपणे शहरवासीयांनी स्वागत केले व प्रसंगी घासातला घास देऊ केला त्याच प्रकारे महाराष्ट्रभरातील लाखो शेतकऱ्यांची पोरं या मोर्चासाठी शहरात आली आहेत. शहरवासीयांनी त्यांनाही घासातला घास देत अन्न, पाणी व निवासाची व्यवस्था करण्यासाठी सहकार्य करावे व मानवतेचे दर्शन घडवावे असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.
राज्य सरकारने अन्न व पाण्याला शस्त्र
न बनविता आंदोलकांशी चर्चा करावी व योग्य तोडगा काढावा असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.
डॉ. अजित नवले
राज्य सचिव
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (पक्ष
दक्षिण मुंबईत सध्या खाऊ गल्ली बंद असल्यामुळे मंत्रालयाजवळ असलेल्या आकाशवाणी आमदार निवासच्या कँटीनमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी जेवायला गर्दी केली. अचानक वाढलेल्या या गर्दीमुळे काही काळासाठी आकाशवाणी आमदार निवासची कँटीन बंद करण्यात आली होती. त्यामुळे आंदोलकानी मोठा गोंधळ केला. आंदोलकांचा गोंधळानंतर टप्प्याटप्प्याने कँटीनमध्ये जेवायला सोडायला सुरुवात केली आहे.
गरजवंत मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर संघर्षयोधा मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या मागण्याबाबत शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देऊन केली. यावेळी ज्येष्ठ आ. श्री. प्रकाशदादा सोळुंके, आ. श्री. सुरेश धस आणि आ श्री संदीप क्षीरसागर उपस्थित होते.
सरकारच्या उपसमितीकडे बीड जिल्ह्यातील आमदारांची नवी मागणी
ज्यांच्याकडे सातबारा आहे त्यांना कुणबी म्हणून ग्राह्य धरा
उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांकडे मांडला प्रस्ताव
आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, सुरेश धस यांनी केली मागणी
कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी आरक्षणाचा मिळतो लाभ
बीडच्या आमदारांनी केलेल्या मागणीवरून नवा वाद उभा राहण्याची शक्यता
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू
तर दुसरीकडे ओबीसी नेते सोमवारपासून जरांगे पाटलांच्या आंतरवाली सराटी गावात आंदोलनाला सुरुवात करणार
जोपर्यंत जरांगे पाटलांचा आंदोलन संपत नाही तोपर्यंत ओबीसी आंदोलन ही अंतरवाली सराटीत सुरू राहणार
एवढेच नाही तर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी नेते आता आंदोलनाला सुरुवात करणार
सर्व पक्षिय ओबीसी नेत्यांच्या बैठकीमध्ये निर्णय
मराठा समाज हा देशातील एकमेव समाज आहे की त्यांना चार चार आरक्षण मिळत असताना ही ते पुन्हा आरक्षणसाठी भांडत असल्याची ओबीसी नेत्यांची भूमिका
Sharad Pawar on Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वात मोठे आंदोलन छेडले गेले असताना आता राज्यातील सर्वात बुजुर्ग आणि जाणते नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी याबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. 72 टक्के आरक्षण तामिळनाडूमध्ये (Tamilnadu Reservation) होऊ शकते. तर घटनेत बदल करता येऊ शकते. घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सुटू शकतो, असे शरद पवार यांनी म्हटले. ते अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील एका कार्यक्रमात बोलत होते. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा मुंबईत उपोषण सुरु केलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. महाराष्ट्रातून लाखो मराठा आंदोलक गाड्या घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मराठा आंदोलन चिघळताना दिसत आहे. याचदरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईत सुरु असणाऱ्या मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
आझाद मैदानातील मोर्चेकऱ्यांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुरविलेल्या नागरी सेवा - सुविधा 👇
🌧️ सततच्या पावसामुळे, आझाद मैदानावर झालेला चिखल हटवून प्रवेशमार्गावर 🚛🚛 २ ट्रक खडी टाकून मार्ग समतल केला.
💡 आझाद मैदान परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी म्हणून मुंबई अग्निशमन दलाच्या माध्यमातून प्रखर झोताचे विद्युत दिवे उभारण्यात आले आहेत.
🚰 आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याचे ११ टँकर्स उपलब्ध केले आहेत. अतिरिक्त टँकर्स मागविले आहेत.
🧹 आंदोलनस्थळ व परिसरात स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत सातत्याने स्वच्छता केली जात आहे. त्यासाठी समर्पित कर्मचारी तैनात आहेत.👷♂️
🏥 वैद्यकीय मदत कक्ष उभारणी करून आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहे.
👨⚕️👩⚕️४ वैद्यकीय पथक आणि २ रुग्णवाहिका मैदान परिसरात २४ तास कार्यरत आहेत. 🚑
🚨 १०८ रुग्णवाहिका सेवा देखील उपलब्ध.
🚻 आझाद मैदान व परिसरातील “पैसे द्या आणि वापरा” या तत्त्वावरील तसेच इतर सर्व सार्वजनिक शौचालये आंदोलकांच्या वापरासाठी मोफत उपलब्ध.
🚻 मैदानात आतील बाजूस एकूण २९ शौचकूप असणारे शौचालय विनामूल्य उपलब्ध.
🚻 आझाद मैदानास लागून असलेल्या महात्मा गांधी मार्गावर प्रत्येकी १० शौचकुपे असलेली ३ फिरती शौचालये उपलब्ध.
🚻 मेट्रो साइट शेजारी १२ फिरती (पोर्टेबल) शौचालये + अतिरिक्त शौचालयांची सोय.
🚻 तसेच, फॅशन स्ट्रीट पदपथ आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर मिळून २५० शौचकूपे असणारी फिरती शौचालये विनामूल्य वापरासाठी पुरवली आहेत.
💨 पावसाळी परिस्थिती पाहता आझाद मैदान परिसरात कीटकनाशक धूम्रफवारणी सातत्याने केली जात आहे. त्यासाठी स्वतंत्र २ पथके कार्यरत आहेत.👷♂️
👨💼इतर आवश्यक सेवा सुविधा पुरवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून आंदोलन परिसरात सातत्याने पाहणी आणि देखरेख. नजीकच्या इतर कार्यालयांमधून अतिरिक्त अधिकारी, कर्मचारी, कामगार यांची नेमणूक.
🥗 बृहन्मुंबई महानगरपालिकेने आझाद मैदान आणि परिसरातील कोणतीही उपाहारगृहे अथवा खाद्यपदार्थांची दुकाने बंद केलेली नाहीत, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा रोखलेला नाही.
आझाद मैदानातील मोर्चेकऱ्यांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुरविलेल्या नागरी सेवा - सुविधा 👇
🌧️ सततच्या पावसामुळे, आझाद मैदानावर झालेला चिखल हटवून प्रवेशमार्गावर 🚛🚛 २ ट्रक खडी टाकून मार्ग समतल केला.
💡 आझाद मैदान परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी म्हणून मुंबई अग्निशमन दलाच्या माध्यमातून प्रखर झोताचे विद्युत दिवे उभारण्यात आले आहेत.
🚰 आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याचे ११ टँकर्स उपलब्ध केले आहेत. अतिरिक्त टँकर्स मागविले आहेत.
🧹 आंदोलनस्थळ व परिसरात स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत सातत्याने स्वच्छता केली जात आहे. त्यासाठी समर्पित कर्मचारी तैनात आहेत.👷♂️
🏥 वैद्यकीय मदत कक्ष उभारणी करून आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहे.
👨⚕️👩⚕️४ वैद्यकीय पथक आणि २ रुग्णवाहिका मैदान परिसरात २४ तास कार्यरत आहेत. 🚑
🚨 १०८ रुग्णवाहिका सेवा देखील उपलब्ध.
🚻 आझाद मैदान व परिसरातील “पैसे द्या आणि वापरा” या तत्त्वावरील तसेच इतर सर्व सार्वजनिक शौचालये आंदोलकांच्या वापरासाठी मोफत उपलब्ध.
🚻 मैदानात आतील बाजूस एकूण २९ शौचकूप असणारे शौचालय विनामूल्य उपलब्ध.
🚻 आझाद मैदानास लागून असलेल्या महात्मा गांधी मार्गावर प्रत्येकी १० शौचकुपे असलेली ३ फिरती शौचालये उपलब्ध.
🚻 मेट्रो साइट शेजारी १२ फिरती (पोर्टेबल) शौचालये + अतिरिक्त शौचालयांची सोय.
🚻 तसेच, फॅशन स्ट्रीट पदपथ आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर मिळून २५० शौचकूपे असणारी फिरती शौचालये विनामूल्य वापरासाठी पुरवली आहेत.
💨 पावसाळी परिस्थिती पाहता आझाद मैदान परिसरात कीटकनाशक धूम्रफवारणी सातत्याने केली जात आहे. त्यासाठी स्वतंत्र २ पथके कार्यरत आहेत.👷♂️
👨💼इतर आवश्यक सेवा सुविधा पुरवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून आंदोलन परिसरात सातत्याने पाहणी आणि देखरेख. नजीकच्या इतर कार्यालयांमधून अतिरिक्त अधिकारी, कर्मचारी, कामगार यांची नेमणूक.
🥗 बृहन्मुंबई महानगरपालिकेने आझाद मैदान आणि परिसरातील कोणतीही उपाहारगृहे अथवा खाद्यपदार्थांची दुकाने बंद केलेली नाहीत, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा रोखलेला नाही.
सकाळपासून जेजे ब्रिज ते सीएसटी स्थानक परिसरात झालेली वाहतूक कोंडी आता कमी झाली आहे. आंदोलकनी एक लेन बेस्ट बेस टॅक्सी साठी खुली करून दिली आहे. त्यामुळे गाड्या हळूहळू पुढे सरकू लागल्या आहेत. सीएसएमटी समोरचा रस्ता बऱ्यापैकी आता खाली केला जात आहे.
मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. आंदोलकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यांना शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होत होती. याची दखल घेत मुंबई महानगरपालिकेने ॲक्शन मोडमध्ये कामाला सुरुवात केली आहे.
आंदोलकांसाठी अतिरिक्त शौचालयांची व्यवस्था करण्यात आली असून पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली आहे. तरीदेखील गर्दी लक्षात घेता शौचालयांची संख्या आणखी वाढवण्याची तयारी पालिकेकडून सुरू आहे. मराठा आंदोलनकर्त्यांना स्वच्छता आणि पाण्याच्या सोयीसाठी महापालिका प्रशासन सक्रिय झाली आहे
मनोज जरांगेंनी केलेले आरोप खोडून पाडण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न
प्रसाधनगृहांसोबतच आझाद मैदान परिसरात लाईट्सची उभारणी
सोबतच, चार मेडिकल टीम, दोन ॲम्बुलन्स देखील आझाद मैदानात
चिखल झालेल्या परिसरात २ टन खडी टाकण्यात आल्याची देखील माहिती
मराठा आंदोलकांच्या आंदोलनानंतर आझाद मैदान , सीएसएमटीच्या परिसरातील खाऊगल्ली उघडली. काल दिवसभर खाऊगल्ली बंद असल्याने मराठा आंदोलकांना खायला काही मिळाले नव्हते.
सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलक अर्धनग्न होऊन आंदोलन करत आहेत
सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलक अर्धनग्न होऊन आंदोलन करत आहेत
सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलक अर्धनग्न होऊन आंदोलन करत आहेत
सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक. गेल्या तासभरापासून बैठक सुरु
सायन - पनवेल हायवेला वाशी टोल नाक्यावर वाहतूक कोंडी .
जड वाहने बाजूला उभी करण्यात आली आहेत.
मुंबईत जड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे.
वाशीपासून मानखुर्द पर्यंत वाहतूक कोंडी होऊ लागली आहे
सीएसएमटी स्थानकात पोलीस आंदोलकांना आझाद मैदानाच्या दिशेने जाण्यासाठी सूचना देत आहे. आता दंगल नियंत्रण पथक देखील स्थानकात दाखल झाल आहे
उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
काही मंत्री रॉयलस्टॉन निवासस्थानी, तर काही ऑनलाईन राहणार उपस्थित
जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत होणार चर्चा
आंदोलन मागे घेण्यासाठी काय उपाययोजना करायच्या? यावर होणार खलबतं
मराठा उपसमितीच्या बैठकीला आतापर्यंत कोण कोण प्रत्यक्ष पोहोचले?
राधाकृष्ण विखे पाटील - अध्यक्ष
गिरीश महाजन
मकरंद आबा पाटील
बाबासाहेब पाटील
दादा भुसे
मनोज जरांगे पाटलांच्या सेवकांनी आवाहन करून सुद्धा आंदोलक ऐकण्याच्या परिस्थितीत नाही. सीएसएमटीसमोर वाहतूक कोंडी. मराठा आंदोलक प्रचंड आक्रमक
आज सकाळी मराठा आंदोलक सीएसएमटी स्थानकाबाहेरील रस्त्यावर उतरले आहेत. याठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. आंदोलक पोलिसांना ऐकायला तयार नाही. मनोज जरांगेंनी आपल्या सहकाऱ्यांमार्फत मराठा आंदोलकांसाठी संदेश पाठवला आहे.
Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी कालपासून (29 ऑगस्ट) मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु केलं आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारशी लढा सुरू आहे. मनोज जरांगेंसह लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. याचदरम्यान महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे शुक्रवारपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, कालपासून मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे मराठा आंदोलकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. या मराठा आंदोलकांना पिण्याचे पाणी, शौचालयात पाणी आणि निवाऱ्याची व्यवस्था पुरवण्यात आलेली नाही. त्यामुळे शनिवारी सकाळी मराठा आंदोलक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाच्या बाहेरील रस्त्यावर उतरले. मराठा आंदोलकांनी या रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा परिसरात ऑटो रिक्षाचालकांनी अवघ्या काही मिनिटांत रस्त्या मधून जाणाऱ्या गटारावरील चार लोखंडी झाकणांची चोरी केल्याची घटना उजेडात आली आहे रात्रीच्या वेळेस रस्त्यावरून जाताना रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदाराने लोखंडी झाकण चोरी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात घेत झाली आहे. वर्सोवा जयप्रकाश रोडवरील आराम नगर एक येथील बरिस्ता आणि हाकिम अलीमजवळील रस्त्यावरील झाकणे चोरीस गेली आहेत.
बीएमसीच्या निकृष्ट डिझाइनमुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला असून नागरिकांनी अशा चोरांवर BNS अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या चोरीमुळे करदात्यांच्या कोट्यवधी रुपयांचा नुकसान होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
सीएसएमटी स्थानक आणि आझाद मैदानाच्या परिसरात मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पोलीस आंदोलकांची समजूत काढत आहेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी सीएसएमटी परिसरात दंगल नियंत्रण पथक रस्त्यावर उतरले.
मुंबईत मराठा आंदोलनाचा (Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha) दुसरा दिवस आहे. हजारो आंदोलक आझाद मैदानात दाखल झालेत. आंदोलकांची आझाद मैदानाबाहेर सीएसएमटी परिसरातही मोठी गर्दी झाली आहे. आंदोलकांच्या गर्दीमुळे सीएसएमटी परिसरात वाहतूक कोंडी झालीय. गेल्या अर्ध्यातासांपासून आंदोलक रस्त्यावर आहेत. पोलीस उपायुक्त स्वतः रस्त्यावर आलेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
ओबीसीतून मराठा आरक्षण पाहिजे हा आग्रह जरांगेंचा असू शकतो. ४-४ वेळा मुख्यमंत्री असलेले शरद पवार, विश्वासघाताने मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे आणि मागील अनेक वर्ष सत्ता भोगलेल्या काँग्रेसने समजावणीचा सूर लावणं अपेक्षित होतं. मात्र, दोन समाजात भांडणं लावण्याचा प्रयत्न ही महाराष्ट्रद्रोही करत आहेत. सत्ता येईल जाईल. मात्र, महाराष्ट्राची सामाजिक वीण बिघडेल याचे भान या लोकांनी ठेवलं नाही, असे केशव उपाध्ये यांनी म्हटले.
आम्हाला पाणी प्यायला नाही, हॉटेल बंद केलेत, मोबाईलचे चार्जरचे पॉइंटही बंद असून सरकारला याचं काही पडलेलं नाही. आम्ही दारू प्यावी यासाठी वाईन शॉप सुरू ठेवले आहे का? असा सवाल आंदोलकांनी केला आहे.
मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी पावसाने नांदेड जिल्ह्यात थैमान घातलं होतं. नांदेड जिल्ह्यातील सर्वच छोट्या-मोठ्या नदी नाल्याला मोठा पूर आला होता. या पुरामुळे नांदेड जिल्ह्यातील जनजीवन पूर्णता विस्कळीत झालं होतं.दरम्यान सध्या कालपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने छोट्या नदी नाल्यांचा पूर आता ओसरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुराचा धोका टळला असला तरी गोदावरी मन्याड आसना आणि पैनगंगा नदीला अद्यापही पूर कायम आहे.हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.
ध्वनिप्रदूषणाच्या विरोधात सोलापुरात मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात आंदोलन पाहायला मिळतं आहे. डीजे-डॉल्बी विरोधात सोलापूर शहरातील नागरिकांनी चळवळ सुरु केलीय.यात आता पोलिसांनी देखील 9 मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांना पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केलय. विसर्जन मिरवणूक ही ध्वनीप्रदूषणमुक्त साजरी करा असे आवाहन सोलापूर पोलिसांच्यावतीने करण्यात आल. विसर्जन मिरवणुकीत 95 टक्के मंडळ पारंपरिक वाद्य वाजवणार असल्याचा विश्वास देखील पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी व्यक्त केला.
आज मराठा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे कालपासून सीएसएमटीच्या समोर असलेली खाऊ गल्ली बहुतांश फुल स्टॉल हे बंद आहेत. त्यामुळे जेवणाचे मोठे हाल मराठा आंदोलकांचे होत आहेत. आज सुद्धा अगदी मोजके फूड स्टॉल हे सुरू असल्याचं पाहायला मिळालं... सरकार हे मुद्दामून बंद करत असल्याचं आंदोलकांचे म्हणणं आहे. त्यामुळे आमची कोंडी करू नका, अशी विनंती ते सरकारकडे करताय. तर खाऊ गल्लीमध्ये मोठी गर्दी दुकानात सुरू ठेवल्यावर होते असं दुकान मालकांचे म्हणणं आहे
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला 19 तास होत आले आहेत. सध्या मनोज जरांगे आराम करत आहेत, तर दुसरीकडे कार्यकर्त्यांची मात्र भर पावसात आणि प्रचंड चिखलात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही अशी आंदोलकांची भूमिका आहे. मनोज जरांगे यांचे आदेश आहेत म्हणून आम्ही शांत आहोत. मुख्यमंत्री यांनी आमच पाणी, खाण बंद केलं आहे मात्र तरीसुद्धा आम्ही माघार घेणार नाही, असे मराठा आंदोलक म्हणाले.
सीएसएमटी स्थानक चौकात सेल्फी पॉईंटजवळ आंदोलकांची गर्दी... गर्दीमुळे दोन्ही-तिन्ही बाजूने वाहतूक कोंडी
सीएसएमटी स्थानकाच्या परिसरात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलकांनी रस्ता रोखून धरल्याने याठिकाणी बस आणि टॅक्सीच्या रांगा लागल्या आहेत. पोलिसांकडून मराठा आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न.
आज सकाळी मराठा आंदोलक सीएसएमटी स्थानकाच्या परिसरात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्याकडून घोषणाबाजी केली जात आहे. मराठा आंदोलकांचे प्रचंड हाल झाल्याने संताप. सीएसएमटीच्या परिसरात मोठी वाहतूक कोंडी, रस्त्यावर आंदोलकांची गर्दी
Beed News: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड जवळील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ सकाळी आठच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने सहा जणांना चिरडले. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी असून त्यांना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातातील जखमी मयत हे पेंडगाव येथे दर्शनासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र मृत व जखमींची नावे अद्याप समजू शकलेले नाहीत. काही दिवसांपूर्वी गढी उड्डाणपुलाजवळ अशाच प्रकारे कंटेनरच्या धडकेत पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला होता. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे.
विरार : विरारच्या रमाबाई अपार्टमेंट मधील भीषण दुर्घटनेत आतापर्यंत एक बिल्डर आणि जमीन मालकांचे चार नातलग अशा एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर MRTP Act आणि BNS कलम 105 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाचही जणांना अटक करण्यात आली आहे.
विरार पूर्वेतील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा काही भाग २६ ऑगस्ट २०२५ रोजी कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेत १२ फ्लॅट्सचा संपूर्ण भाग जमीनदोस्त झाला. इमारतीत एकूण ५० फ्लॅट्स व काही दुकाने होती. दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला असून, नऊ जखमीं झाले होते.
वसई-विरार शहर महानगरपालिकेने या भागाला आधीच बेकायदेशीर बांधकाम म्हणून घोषित केले होते. मे २०२५ मध्ये पालिकेने इमारतीच्या संरचनात्मक तपासणीसाठी Structural Audit करण्याचा आदेश दिला होता. तसेच स्थलांतरच्या सुचना देखील जारी करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली होती. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही न झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
मराठा आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मराठा बांधवांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची खंत तरुणानी बोलवून दाखवली. जेवायला अन्न घेऊन आलोय, शौचालय आता आणली त्यात पाणी नाही. आंघोळीला आता या टॅकरखाली बसावं लागत आहे. सरकार जाणीवपूर्वक आंदोलन चिरडण्यासाठी हे करत असल्याची प्रतिक्रिया या तरुणांनी दिली. मात्र, कितीही त्रास झाला तरी गुलाल लागल्याशिवाय जाणार नसल्याची तरुणांनी प्रतिक्रिया दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी जाणून घेतली मराठा आंदोलनाची माहिती; विनोद तावडे यांच्याशी मुंबईत चर्चा, बैठकीत नेमकं काय ठरलं? सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
आझाद मैदानात भर पावसात हलगी वाजवत मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे
साताऱ्यामध्ये आयटी पार्क व्हावे,अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. याविषयीची विशेष आढावा बैठक एप्रिल महिन्यात उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडली होती.अखेर या प्रकल्पाला मान्यता मिळाली असून सातारा शहराजवळील लिंबखिंड परिसर आणि विलासपूर परिसराच्या जागेची पाहणी उद्योग विभागाकडून करण्यात आली आहे. या जागेचे ड्रोन द्वारे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून येथील जागा हस्तांतरणासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना सूचना करण्यात आल्या आहेत. लिंब खिंड परिसरात राष्ट्रीय महामार्गालगत शासनाची साधारण 84 एकर जमीन ही या नियोजित आयटी पार्क प्रकल्पासाठी हस्तांतरित केली जाणार असून यामुळे अनेक वर्षांची साताऱ्याच्या आयटी पार्क पुणे विषयीची इच्छा पूर्ण होणार असून अनेक तरुणांना नोकरीची संधी या आयटी पार्क मधील कंपन्यांमुळे निर्माण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील माकणी इथं असलेल्या निम्न तेरणा प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत पाण्याची आवक वाढल्याने दरवाजे उघडण्यात आले असून 3816 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा दरवाजे उघडण्यात आले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास यामध्ये वाढ केली जाऊ शकते.
मुंबईतला मराठा आंदोलकांचा मुक्काम हा वाढलेला आहे आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी केलेला आहे. आझाद मैदानच्या आजूबाजूच्या ज्या हॉटेल्स किंवा जेवणाचे स्टॉल्स आहेत ते बंद असल्यामुळे मराठा आंदोलक नाश्त्याची सोय करताना पाहायला मिळत आहेत. आंदोलक झोपेतून उठल्यानंतर नाष्टा,चहाची सोय आंदोलकांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे मोठी गर्दी नाश्त्यासाठी आंदोलकांची पाहायला मिळत आहे. जोपर्यंत आंदोलन सुरू राहील तोपर्यंत मराठा बांधवांसाठी ही नाश्त्याची सोय सुरू ठेवू, असेही आंदोलकांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय.
मराठा आंदोलकांनीच केली आंदोलकांसाठी नाष्ट्याची सोय, हॉटेल आणि फूड स्टॉल बंद असल्याने जेवणाची अडचण. मुंबईतला मराठा आंदोलकांचा मुक्काम हा वाढलेला आहे आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी केलेला आहे... आझाद मैदानच्या आजूबाजूच्या ज्या हॉटेल्स किंवा जेवणाचे स्टॉल्स आहेत ते बंद असल्यामुळे मराठा आंदोलक नाश्त्याची सोय करताना पाहायला मिळत आहेत. आंदोलन झोपेतून उठल्यानंतर नाष्टा आणि चहाची सोय आंदोलन करून करण्यात आली आहे... त्यामुळे मोठी गर्दी नाश्त्यासाठी आपल्याला आंदोलकांची पाहायला मिळत आहे... जोपर्यंत आंदोलन सुरू राहील तोपर्यंत मराठा बांधवांसाठी ही नाश्त्याची सोय सुरू ठेवू, असे मराठा आंदोलकांकडून सांगण्यात आले.
Maratha Reservation Manoj Jarange Patil agitation at Azad Maidan Mumbai: मराठा समजाला ओबीसी कोट्यातून आणि सगेसोयऱ्यांचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarane Patil) यांनी शुक्रवारपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबत हजारो मराठा बांधव मुंबईत आले होते. मात्र, मुंबईत कालपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे (Mumbai Rain) मराठा आंदोलकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
आंदोलकांसाठी काहीजणांनी नाश्त्याची सोय केली आहे.. पोहे,केळी. चहा आंदोलकांना सकाळच्या नाश्त्यासाठी देण्यात आले आहेत. नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये राहणारे मराठा आंदोलक ट्रेनने मुंबईत जाणार. गाड्या नवी मुंबईत उभ्या करून मुंबईत जाणार
आझाद मैदानावर मनोज जरांगे यांच्यासोबत आलेल्या मराठा बांधवांना सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शौचालयात पाणी नसल्याने बिसलरीच्या बाटल्या घेऊन जाण्याची वेळ, मराठा आंदोलक संतप्त
मातीचे घर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गोंदियाच्या तिरोडा शहरातील संत सज्जन वार्ड परिसरात घडली. प्रतिभा मेश्राम (52) असे मृत महिलेचे नाव असून, त्या संत सज्जन वाॅर्ड रेल्वेस्थानक परिसरात राहत होत्या. विशेष म्हणजे, त्यांचे कोणतेही नातेवाइक किंवा मुले नसल्यामुळे त्या एकट्याच मातीच्या घरात राहात होत्या. सतत झालेल्या पावसामुळे त्यांचे घर अचानक कोसळले. घर कोसळल्याने त्या मातीखाली दबल्या गेल्या आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तिरोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या सहाय्याने मातीचा ढिगारा हटवून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठविण्यात आला
काल ईस्टर्न फ्री वेवर त्यासोबत जे जे ब्रिज वर मराठा आंदोलन आझाद मैदानाच्या दिशेने येत असताना मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती मात्र ती वाहतूक कोंडी आज होऊ नये याची खबरदारी आंदोलकांपासून पोलिसांपर्यंत प्रत्येकाने घेतली आहे. वाडी बंदर या ठिकाणी तर गाड्यांना पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय सीएसएमटी स्टेशनच्या बाहेर सुद्धा मोठ्या संख्येने आलेल्या गाड्या या पार्क करण्यात आलेल्या आहेत. एका रांगेत या गाड्या पार्क करून मधली लेन ही वाहतूक सुरळीत राहावी यासाठी सुरू ठेवण्यात आली आहे... कशाप्रकारे वाहतुकीचे नियोजन केले आणि कशाप्रकारे अगदी रांगेत ही वाहने उभी केली आहेत
Maratha Reservation : मराठा आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. रात्री हजारोच्या संख्येने आलेल्या मराठा आंदोलकांनी सीएसएमटी स्टेशनवर विश्रांती घेतली... बाहेर कुठे राहायची सोय आझाद मैदान च्या जवळ नसल्याने थेट सीएसएमटी स्टेशनवरच या आंदोलकांनी प्लॅटफॉर्मवर झोप काढली... अनेक जण आता झोपेतून उठून थेट आझाद मैदान गाठत आहेत आणि आंदोलनात सहभागी होत आहेत... जोपर्यंत आरक्षणाच्या मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मुक्काम हा सीएसएमटी स्टेशनवरच असेल अशा प्रतिक्रिया आंदोलकांनी दिल्या.
मराठा आंदोलकांची रात्र आझाद मैदानावर तर काहींची सीएसएमटी स्टेशनवर, मागणी मान्य होत नाही तोपर्यंत रोजच आता मुक्काम सीएसएमटी स्टेशनवर. आज मराठा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे... रात्री हजारोच्या संख्येने आलेल्या मराठा आंदोलकांनी सीएसएमटी स्टेशनवर विश्रांती घेतली... बाहेर कुठे राहायची सोय आझाद मैदानाच्या जवळ नसल्याने थेट सीएसएमटी स्टेशनवरच या आंदोलकांनी प्लॅटफॉर्मवर झोप काढली... अनेक जण आता झोपेतून उठून थेट आझाद मैदान गाठत आहेत आणि आंदोलनात सहभागी होत आहेत. जोपर्यंत आरक्षणाच्या मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मुक्काम हा सीएसएमटी स्टेशनवरच असेल, अशा प्रतिक्रिया आंदोलकांनी दिल्या
मनोज जरांगे यांच्या आंदोलनांनंतर ओबीसी समाज आक्रमक. नागपूरच्या संविधान चौकात आज पासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण.. सकाळी ९:३० मिनिटांनी सुरू होणार ओबीसी समाजाचे आंदोलन...
ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या
* मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देवू नये
* ओबीसी समाजाला जो राज्य सरकारने शब्द दिला, त्या बदल लेखी आश्वासन
मनोज जरांगे यांच्या आंदोलनांनंतर ओबीसी समाज पण आक्रमक...
नागपूरच्या संविधान चौकात आज पासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण..
सकाळी ९:३० मिनिटांनी सुरू होणार ओबीसी समाजाचे आंदोलन...
ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या
-मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देवू नये
-ओबीसी समाजाला जो राज्य सरकारने शब्द दिला, त्या बदल लेखी आश्वासन
आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दोनशे ते अडीचशे अधिकाऱ्यांसह 1500 हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
गोकुळ दूध संघाकडून गणेशोत्सवात दूध उत्पादक शेतकऱ्यांना गिफ्ट
म्हैस आणि गाईच्या दूध खरेदी दरामध्ये प्रतिलीटर 1 रुपयाने गोकुळने केली वाढ
म्हैस दूध खरेदी दर प्रतिलीटर 50 रुपये 50 पैसे वरून 51 रुपये 50 पैसे असा केला
तर गाईच्या दूध खरेदी दरामध्ये प्रतिलिटर 32 रुपयांवरून 33 रुपये केला
गोकुळ दूध संघाने केलेल्या खरेदी दराच्या वाढीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा
सीएसएमटी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एकपासून ते प्लॅटफॉर्म नंबर १० पर्यंत जागा मिळेल तिथे आझाद मैदानावर आलेल्या मराठा आंदोलकांनी विश्रांतीसाठी आसरा घेतला. आता हे आंदोलक झोपेतून उठायला सुरुवात झाली आहे
सीएसएमटी स्टेशनच्या बाहेर जेजे ब्रिज उतरल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा टाइम्स ऑफ इंडिया बिल्डिंगच्या बाहेर आणि सीएसएमटी स्टेशनच्या बाहेर दोन्ही बाजूंनी टेम्पो ट्रक बस मराठा आंदोलकांनी पार्क केले आहेत. त्यामुळे एकच लेन दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी सुरू आहे
मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे आझाद मैदानात चिखल झाला आहे. यामुळे मराठा आंदोलकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. रात्री मुंबईत पावसाची रिपरिप सुरू असताना शेकडो मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा आसरा घेतला. तिकीट घर ते अगदी फलाटा पर्यंत शेकडो मराठ्यांनी रात्री झोपण्यासाठी आसरा घेतला. मुंबईच्या या महत्वाच्या स्थानकात रात्रभर एक मराठा लाख मराठा जयघोष गुंजत होता. इथे कायदा सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस ही तैनात होते.
आझाद मैदानात गेल्या अर्धा तासापासून पाऊस कोसळत आहे. यामुळे मैदानात चिखल झाला आहे. मराठा आंदोलकांची गैरसोय
मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची विनोद तावडे यांच्याशी चर्चा
राज्यातील मराठा आरक्षणासह, बिहार निवडणूक आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा
मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाबाबतही अमित शहा यांनी विनोद तावडे यांच्याकडून घेतली माहिती
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- मुंबई
- Manoj Jarange Maratha Reservatio LIVE: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आणि एकनाथ शिंदेंची महत्त्वाची बैठक