एक्स्प्लोर
महिलेने गुप्तांग कापलेल्या डोंबिवलीतील तरुणाचा मृत्यू
मुंबईतील जेजे रुग्णालयात तुषारला दाखल करण्यात आलं होतं, मात्र आज सकाळी उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.
कल्याण : छेडछाडीला कंटाळून डोंबिवलीतील महिलेने टोकाचा निर्णय घेत ज्या तरुणाचं गुप्तांग कापलं होतं, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तुषार पुजारेची मृत्यूशी चार दिवसांची झुंज अपयशी ठरली.
मुंबईतील जेजे रुग्णालयात तुषारला दाखल करण्यात आलं होतं, मात्र आज सकाळी उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. आधी लाईफ केअर, त्यानंतर एम्स आणि तिथून मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये त्याला हलवण्यात आलं होतं.
25 डिसेंबर रोजी डोंबिवलीच्या नांदीवली भागात महिलेने तुषारचं गुप्तांग कापलं होतं. वारंवार छेड काढणाऱ्या तरुणाला अद्दल घडवण्यासाठी तिने हे पाऊल उचललं होतं. पोलिसांनी या महिलेसह तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
डोंबिवली पश्चिमेला जुनी डोंबिवली भागात राहणारा 27 वर्षांचा तुषार पुजारे हा तरुण त्याच्या शेजारी राहणाऱ्या 42 वर्षीय विवाहितेकडे वारंवार शारीरिक सुखाची मागणी करत होता. आठवडाभरापूर्वी तर तुषारने थेट या महिलेच्या पतीला भेटून तिला घटस्फोट देण्याची मागणी केली.
या सर्व प्रकाराला संतापलेल्या महिलेनं आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने तुषारला डोंबिवली पूर्वेच्या नांदिवली टेकडीजवळ बोलावलं. तिथे आल्यानंतर त्याचे हातपाय बांधून मारहाण करत त्याचं गुप्तांग कापून टाकलं. पोलिसांनी महिलेसह साथीदार प्रतीक केणीया आणि तेजस म्हात्रे यांना अटक केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement