एक्स्प्लोर

मॉलमधील वाईन शॉपनासुद्धा ऑनलाईन मद्यविक्रीची परवानगी द्या, हायकोर्टात याचिका

मुंबई महापालिकेच्या 22 मे च्या परिपत्रकानुसार होम डिलिव्हरीद्वारे ऑनलाईन मद्य विक्रीस सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत परवानगी दिली होती. त्यामुळे मॉलमधील वाईन शॉपनाही ऑनलाईन मद्य विक्री करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी उच्च न्यायालयाकडे केली आहे.

मुंबई : मॉलमध्ये वाईन शॉप असलेल्यांनाही ऑनलाईन होम डिलिव्हरी पद्धतीने मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका दक्षिण मुंबईतील एका मॉलमधील मद्यविक्रीचे दुकान असलेल्या मालकानं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्याची दखल घेत उच्च न्यायलयाने राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाला त्यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट येथील सीआर- 2 मॉलमधील ओजस मार्केटिंग मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीचे 'वर्ल्ड ऑफ वाईन' नामक वाईन शॉप आहे. शॉप हे मॉलमध्ये असले तरी त्यांना स्वतंत्र प्रवेशद्वार आहे. मात्र तसे असूनही त्यांना स्टॅण्ड अलोन (एकल) दुकान म्हणून परवानगी देण्यात आली नाही. त्याविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेवर न्यायमूर्ती एस. जे. काथावाला आणि न्यायमूर्ती एस. पी. तावडे यांच्या खंडपीठासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी पार पडली.
आपलं शॉप हे मॉलमध्ये असलं तरी दुकानात येण्या-जाण्यास स्वतंत्र मार्गिका आहे. तसं असूनही महापालिका प्रशासनाकडून स्टॅण्ड अलोन (एकल) शॉप म्हणून परवानगी नाकारण्यात आली असल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच मुंबई महापालिकेच्या 22 मे च्या परिपत्रकानुसार होम डिलिव्हरीद्वारे ऑनलाईन मद्य विक्रीस सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत परवानगी दिली होती. त्यामुळे मॉलमधील वाईन शॉपनाही ऑनलाईन मद्य विक्री करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी उच्च न्यायालयाकडे केली आहे. त्याची दखल घेत उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाला याबाबत उत्तर सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी 5 जूनपर्यंत तहकूब केली.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Embed widget