मुंबई: कर्नल प्रसाद पुरोहित यांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून आरोपमुक्त करण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेचा निर्णय आता 16 जुलैला येणार आहे. या याचिकेवर आज अंतिम निर्णय येण्याची शक्यता होती, पण मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय 16 जुलैपर्यंत राखून ठेवला आहे.
साल 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणा कर्नल प्रसाद पुरोहित हे आरोपी आहेत.
कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आपल्यावर आरोप ठेवण्यापूर्वी लष्कराची परवानगी घेण्यात आली नसल्यानं, आपल्याविरोधात खटलाच दाखल करता येत नाही, असं म्हणत आरोपमुक्त करण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात केली आहे.
मालेगाव स्फोटाचा चेहरा बनलेले प्रसाद पुरोहित यांची कहाणी आहे तरी काय?
पुरोहित यांच्या या याचिकेला एनआयएनं मात्र विरोध केला आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने पुरोहित यांना एनआयए कोर्टात जाण्याचे निर्देश दिले असल्यानं, हायकोर्टात त्यांनी असा अर्ज करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
यावरच आज न्यायमूर्ती आर. एम. मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठापुढे पुन्हा सुनावणी होणार आहे. कर्नल पुरोहित यांच्यावरील मोक्का अंतर्गत असलेले आरोप हटवण्यात आले असून, त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत मात्र आरोप कायम ठेवण्यात आलेले आहेत.
पुरोहित जामीनावर बाहेर
2008 मधील मालेगाव स्फोटाप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंहपाठोपाठ लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहितलाही जामीन मंजूर झाला . सर्वोच्च न्यायालयाने 9 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या कर्नल पुरोहित यांना 21 ऑगस्ट 2017 रोजी जामीन मंजूर केला.
कोण आहेत कर्नल प्रसाद पुरोहित?
लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित... 2008 च्या मालेगाव स्फोटानंतर देशभरातलं सर्वात चर्चेत असलेलं नाव.. एटीएसने पुरोहितांना अटक केल्यानंतर तब्बल 9 वर्ष त्यांनी जेलमध्ये घालवली आणि अखेर सुप्रीम कोर्टाने 21 ऑगस्ट 2017 रोजी त्यांना जामीन मंजूर केला.
मालेगाव स्फोटात 7 जणांचा जीव गेला होता. तर 80 हून अधिक लोक जखमी झाले होते. यानंतर हिंदुत्ववादी संघटना एटीएसच्या रडारवर आल्या. त्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, कर्नल श्रीकांत पुरोहितांसह 10 जणांना अटक करण्यात आली.
केंद्रीय गृहखात्याने 2011 च्या सुरुवातीला तपास एनआयएकडे सोपवला. 4 हजार पानी आरोपपत्र दाखल झालं. पण 9 वर्षात एकाही आरोपाची निश्चिती झाली नाही. याआधी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांचा जामीन हायकोर्टानेही फेटाळला होता. त्याला पुरोहितांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.
एनआयएला 9 वर्ष केस तडीस लावण्यात यश आलं नाही. शिवाय आमच्याकडे ठोस पुरावे आहेत, याशिवाय मोठा युक्तीवादही करणं शक्य झालं नाही. याउलट पुरोहितांची बाजू देशातले नामांकित वकील हरीश साळवेंनी मांडली. आरोपपत्रात एनआयएने विसंतगत आणि परस्परविरोधी माहिती दिल्याचं साळवेंनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.
मालेगाव बॉम्बस्फोट
2008 साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला होता तर 80 जण जखमी झाले होते. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावत एका बाईकमध्ये बॉम्ब लावून स्फोट घडवण्यात आला होता. यानंतर स्फोटासाठी आरडीएक्स पुरवणं आणि कट रटल्याच्या आरोपाखआली साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना अटक करण्यात आली होती.
संबंधित बातम्या
तळोजा जेलमधून कर्नल पुरोहितांची उद्या सुटका होणार
ले. कर्नल पुरोहित पुन्हा मुंबई हेडक्वार्टरमध्ये ड्युटी जॉईन करणार?
2008 मालेगाव स्फोट : कर्नल पुरोहितला अखेर जामीन
मालेगाव स्फोटाचा चेहरा बनलेले प्रसाद पुरोहित यांची कहाणी आहे तरी काय?
कर्नल प्रसाद पुरोहित यांचा फैसला आता 16 जुलैला!
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
22 Jun 2018 11:06 AM (IST)
साल 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणा कर्नल प्रसाद पुरोहित हे आरोपी आहेत. त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून आरोपमुक्त करण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेचा निर्णय आता 16 जुलैला येणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -