'ब्लॉग माझा' स्पर्धेचा निकाल आणि पुरस्कार वितरण 14 डिसेंबरला
एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र, डिजिटल महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ब्लॉग माझा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात जाईल. येत्या शुक्रवारी म्हणजे 14 डिसेंबरला हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
!['ब्लॉग माझा' स्पर्धेचा निकाल आणि पुरस्कार वितरण 14 डिसेंबरला Majha Maharashtra, Digital Maharashtra 2018 programme on friday 'ब्लॉग माझा' स्पर्धेचा निकाल आणि पुरस्कार वितरण 14 डिसेंबरला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/12181910/Majha-Maharahtra.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : एबीपी माझातर्फे दरवर्षी ‘ब्लॉग माझा’ स्पर्धा आयोजित करण्यात येते. प्रथम, द्वितीय, तृतीय असे तीन आणि पाच उत्तेजनार्थ विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र, डिजिटल महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ब्लॉग माझा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात जाईल. येत्या शुक्रवारी म्हणजे 14 डिसेंबरला हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या शेकडो ब्लॉगर्समधून टॉप ब्लॉग निवडणं, हे परीक्षकांसमोरील मोठं आव्हान होतं. फेसबुक, ट्विटरसारख्या आधुनिक माध्यमांच्या व्यासपीठांवर अनेकजण लिहितात.
मात्र या लेखनाला दीर्घ स्वरुप आणि रचनात्मक रुप मिळतं, ते ब्लॉगसारख्या व्यासपीठामुळे. या व्यासपीठावरील लेखनास अधिक प्रोत्साहन मिळावं म्हणून एबीपी माझातर्फे दरवर्षी ‘ब्लॉग माझा’ स्पर्धा आयोजित करण्यात येते.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ पत्रकार मुकेश माचकर आणि राम जगताप यांनी काम पाहिलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)