एक्स्प्लोर

राज ठाकरे म्हणतात, अधिकाऱ्यांना तुडवा; महावितरण म्हणतं...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 12 व्या वर्धापन दिनानिमित्त पदाधिकाऱ्यांचा मेळावा शुक्रवारी 9 मार्च वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडला.

मुंबई : महावितरणने आजवर कुठल्याही राजकीय पक्षाच्या जाहीर सभेचे वेळी वीजपुरवठा बंद केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत केलेलं वक्तव्य अत्यंत खेदजनक आहे, अशी प्रतिक्रिया महावितरणने दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 12 व्या वर्धापन दिनानिमित्त पदाधिकाऱ्यांचा मेळावा शुक्रवारी 9 मार्च वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडला. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर येत्या 18 मार्चला शिवतीर्थावर जाहीर सभा घेणार आहे. त्यावेळी महाराष्ट्रातील वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी वीज घालवली तर त्यांना तुडवा, असं चिथावणीखोर वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. यानंतर महावितरणने परिपत्रक काढून स्पष्टीकरण दिलं आणि राज ठाकरेंच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. “मूळात महावितरणने आजवर कधीही आणि कुठल्याही राजकीय सभेचे वेळी जाणीवपूर्वक वीजपुरवठा बंद केलेला नसून याबाबत राज ठाकरेचं हे चिथावणीखोर वक्तव्य अत्यंत खेदजनक आहे,” असं महावितरणने म्हटलं आहे. ‘भाषणावेळी वीज घालवणाऱ्यांना तुडवा’, राज यांचं चिथावणीखोर वक्तव्य मनसेचा 12 वा वर्धापन दिन, आज पदाधिकाऱ्यांचा मेळावा महावितरणने पुढे म्हटलं आहे की, “महावितरण आजवर कुठल्याही राजकीय पक्षाच्या दबावाला बळी पडलेला नाही. महावितरणचे अधिकारी, अभियंता आणि कर्मचारी हे केवळ आणि केवळ ग्राहक सेवेचे कर्तव्य पार पाडत असतात. कुठल्याही राजकीय पक्षाच्या सांगण्यावरुन वीजपुरवठा बंद पाडण्याची प्रथा किंवा संस्कृती महाराष्ट्रातील महावितरणमध्ये नाही.” “आज राज्यात सर्वत्र वीजेची उपलब्धता योग्य प्रमाणात असल्याने राज्य भारनियमनमुक्त आहे. अशावेळी वीजपुरवठा बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आज महावितरणचा प्रत्येक कर्मचारी थकबाकी वसुली करण्याच्या कामी लागला असून राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा फायदा राज्यातील काही थकबाकीदार घेण्याची शक्यताच अधिक आहे. त्यामुळे असा प्रकार होणार नाही याची ग्वाहीही राज ठाकरे यांनी देणं आवश्यक आहे.” उगाच असे चितावणीखोर वक्तव्य करुन महावितरणच्या अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खच्चीकरणाचा प्रयत्न कुणीही करु नये, असा सल्ला महावितरणने दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Manhole Video Marathi News: मुंबईतील साकीनाकाजवळ मॅनहोलमध्ये माणूस कसा पडला?; अंगावर काटा आणणारा VIDEO
मुंबईतील साकीनाकाजवळ मॅनहोलमध्ये माणूस कसा पडला?; अंगावर काटा आणणारा VIDEO
धक्कादायक! मुंबईत 'मॅनहोल'मध्ये पडला माणूस, फक्त छत्री अन् चप्पल आढळली; अखेर मृतदेह बाहेर, महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! मुंबईत 'मॅनहोल'मध्ये पडला माणूस, फक्त छत्री अन् चप्पल आढळली; अखेर मृतदेह बाहेर, महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह
Mumbai Sakinaka Manhole : मुंबईच्या साकीनाक्याजवळ मॅनहोलमध्ये माणूस नेमका कसा पडला?; चक्रावणारी माहिती समोर, व्यक्तीचा मृत्यू
मुंबईच्या साकीनाक्याजवळ मॅनहोलमध्ये माणूस नेमका कसा पडला?; चक्रावणारी माहिती समोर, व्यक्तीचा मृत्यू
Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात

व्हिडीओ

Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
Mumbai Rain: मोबाईलवर बोलता बोलता अरुंद मॅनहोलमध्ये माणूस पडला, मुंबईत सर्च ऑपरेशनचा थरार, PHOTO
मोबाईलवर बोलता बोलता अरुंद मॅनहोलमध्ये माणूस पडला, मुंबईत सर्च ऑपरेशनचा थरार, PHOTO
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची दखल
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची दखल
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल
धक्कादायक! मुंबईत 'मॅनहोल'मध्ये पडला माणूस, फक्त छत्री अन् चप्पल आढळली; अखेर मृतदेह बाहेर, महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! मुंबईत 'मॅनहोल'मध्ये पडला माणूस, फक्त छत्री अन् चप्पल आढळली; अखेर मृतदेह बाहेर, महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह
दगडी खाणीत 40 फूट उंचीवरून महाकाय दगड अंगावर कोसळला; रोजंदारीवरील आठ कामगार जाग्यावर गतप्राण, जखमीचा आकडा अजूनही निश्चित नाही
दगडी खाणीत 40 फूट उंचीवरून महाकाय दगड अंगावर कोसळला; रोजंदारीवरील आठ कामगार जाग्यावर गतप्राण, जखमीचा आकडा अजूनही निश्चित नाही
Ketan Agrawal Case Pune: हातात बाटली, फोनवरून मोठ्या आवाजात शिव्या अन् नंतर चेतनला मारलेली मिठी, सियाचा पबमधील VIDEO समोर
हातात बाटली, फोनवरून मोठ्या आवाजात शिव्या अन् नंतर चेतनला मारलेली मिठी, सियाचा पबमधील VIDEO समोर
Gokul Election: 'गोकुळ' गुजरातच्या दावणीला बांधायचा आहे का? जाब विचारण्याची धमक महायुतीमधील एकाही नेत्यामध्ये नाही; राजू शेट्टींचा हल्लाबोल
'गोकुळ' गुजरातच्या दावणीला बांधायचा आहे का? जाब विचारण्याची धमक महायुतीमधील एकाही नेत्यामध्ये नाही; राजू शेट्टींचा हल्लाबोल
Embed widget