मुंबई : शिवसेना-भाजप युती होऊ अगर न हो, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर एबीपी माझाशी बोलताना केला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर एकटे लढायचे की, कोणासोबत जायचे ते ठरवू, पण आमचं अस्तित्व आम्ही टिकवणार, असंही ते म्हणाले.
सरकारच्या गेल्या चार वर्षाचं विश्लेषण दिवाळीच्या गोड सणानिमित्त करणं योग्य वाटत नाही, दिवाळीनंतर सविस्तर बोलेन, असे राणे यावेळी म्हणाले. शिवसेना भावनिक विषयाला हात घालून संधी साधण्याच्या प्रयत्नात आहे पण लोकं सुज्ञ आहेत असे म्हणत आताच अयोध्या का सुचलं? गेली चार वर्षं अयोध्या आणि राम नव्हते का जागेवर? असा सवाल नारायण राणे यांनी केला.
निवडणुकीचा दारुगोळा निवडणुकीलाच उडवणार असल्याचे सांगत सध्या दिवाळीचे फटाके कोर्टाच्या नियमानुसार फोडतोय, असेही ते म्हणाले. पारंपरिक पद्धतीने सर्व नातेवाईकांसोबत दिवाळी साजरी करतो. घरचा फराळ घरीच बनवतो, विकत आणत नाही असे सांगत फराळात तिखट, गोड, आंबट सगळंच खातो पण करंजा आवडतात, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष निवडणूक लढवणारच, नारायण राणेंचा निर्धार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Nov 2018 06:06 PM (IST)
सरकारच्या गेल्या चार वर्षाचं विश्लेषण दिवाळीच्या गोड सणानिमित्त करणं योग्य वाटत नाही, दिवाळीनंतर सविस्तर बोलेन, असे राणे यावेळी म्हणाले. शिवसेना भावनिक विषयाला हात घालून संधी साधण्याच्या प्रयत्नात आहे पण लोकं सुज्ञ आहेत असे म्हणत आताच अयोध्या का सुचलं? गेली चार वर्षं अयोध्या आणि राम नव्हते का जागेवर? असा सवाल नारायण राणे यांनी केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -