एक्स्प्लोर

प्रशासन एसटी संप चिघळवतंय: इंटक

संप मिटविण्याऐवजी एसटी प्रशासन संप चिघळवत आहे, असा गंभीर आरोप इंटकचे सरचिणीस मुकेश तिगोटेंनी केला.

मुंबई: संप मिटविण्याऐवजी एसटी प्रशासन संप चिघळवत आहे, असा गंभीर आरोप इंटकचे सरचिणीस मुकेश तिगोटेंनी केला. एवढंच नाही तर सरकारनं जोरजबरदस्ती केली तर आम्ही कुटुंबियांसह राज्यभर जेलभरो आंदोलन करु असा इशारा त्यांनी दिला. ते एबीपी माझाशी बोलत होते. राज्यातील विविध आगरातून कर्मचाऱ्यांना हकलवून दिलं जातंय, दमदाटी केली जातेय. सर्क्युलर काढून होमगार्ड्सची भरती करून एसटी काढल्या जात आहेत. कालच्या प्रस्तावानुसार आम्हाला 4 ते 5 हजार वेतन वाढ मिळेल, 12 ते 13 हजार रुपये पगारात आमच्या मूलभूत गरजा भागणार नाहीत.  इतर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे हीच आग्रहाची विनंती आहे.  मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे, चर्चेसाठी बोलावलं तर आम्ही तयार आहोत, असं मुकेश तिगोटे म्हणाले. दिवाकर रावते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला तीन दिवसांच्या संपानंतर आता एसटीच्या संपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे. काही वेळापूर्वी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि संपाबाबत माहिती दिली. त्यामुळे आता मुख्यमंत्री मध्यस्थी करणार की हातावर हात ठेवून गप्प बसणार हे पाहणं महत्वाचं आहे. रावतेंविरोधात एसटी कर्मचाऱ्यांचा संताप तिकडे धुळे शहरातमध्ये एसटी कर्मचारी आक्रमक झाले आणि त्यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावतेंच्या विरोधात अर्धनग्न आंदोल केलंय. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर कोल्हापुरातही एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाकर रावतेंचं पोस्टर फाडलंय. रावतेंच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलनही करण्यात आलंय. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करण्यात आली. खासगी वाहतूकदारांची चंगळ दरम्यान सध्या एसटीचा संप सुरु असल्यानं खासगी वाहतुकीला फायदा होतोय.प्रवासभाडं दुपटी-तिपटीनं वाढवण्यात आलंय. कोकणतही हीच परिस्थिती पाहायला मिळतेय. माती लावून अभ्यंगस्नान तर तिकडे नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध म्हणून उटण्याऐवजी माती लावून अभ्यंग स्नान केलं. हा संप मोडीत काढण्यासाठी प्रशासनानं  राज्यभर विश्रामगृहाचं पाणी, शौचालय, स्वच्छतागृह आणि वीज बंद केली आहे. जे कर्मचाऱी आहेत. त्यांना विश्रामग्रहातून बाहेर काढलं जातंय. त्याचा निषेध म्हणून एसटी कर्मचाऱ्यांनी हे अनोखं आंदोलन केलं. तर दुसरीकडे एसटीच्या संपामुळं नाशिक आगारात अडकून पडलेल्या चालक आणि वाहकांसाठी  दिवाळीच्या फराळाचं वाटप करण्यात आलं. बसस्थानकावर चिवडा फराळ खात या एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळी साजरी केली.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
कोणी हस्तक्षेप करुन कुणबी प्रमाणपत्र रद्द केली असतील तर त्यावर यंत्रणा बसवण्याचा विचार, जरांगेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर 
कोणी हस्तक्षेप करुन कुणबी प्रमाणपत्र रद्द केली असतील तर त्यावर यंत्रणा बसवण्याचा विचार, जरांगेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर 
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget