Mahavikas Aghadi Morcha Sharad Pawar: महाराष्ट्रातील महापुरुषांचे नाव आणि त्यांच्या कार्याचे देशभरात आदराने स्मरण केले जाते. मात्र, याच महापुरुषांबाबत राज्यपाल (Governor Bhagatsingh Koshyari) वादग्रस्त वक्तव्य करतात.  त्यामुळे त्यांची हकालपट्टी लवकरात लवकर करा अन्यथा हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवय रहाणार नाही असा इशारा शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला. महापुरुषांबद्दल गलिच्छ शब्द वापरणाऱ्यांना धडा शिकवावाच लागणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. 


महाविकास आघाडीच्यावतीने (Mahavikas Aghadi Morcha) महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणारे राज्यपाल आणि भाजप नेत्यांविरोधात आज मुंबईत (Mumbai) मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल आणि भाजपवर हल्लाबोल केला. शरद पवार यांनी म्हटले की, आपण आज महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आपण एकत्र आलो आहोत. ज्यांच्या हातात सत्तेची चावी आहे. महाराष्ट्राचा महापुरुषांबाबत चुकीची भाषा वापरत आहेत. शिवाजी महाराज यांचं नावं आज साडे तीनशे वर्ष झाले तरी नावं अखंड आहे. त्यांच्या नावाचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. त्यामुळेच आज लाखोंच्या संख्येने मोर्चा एकत्र आला आहे. जर माफी मागितली गेली नाही तर हा तरुण शांत बसणार नाही, असा इशाराही शरद पवार यांनी दिला. 


आपण आज महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आपण एकत्र आलो आहोत. ज्यांच्या हातात सत्तेची चावी आहे. महाराष्ट्राचा महापुरुषांबाबत चुकीची भाषा वापरत आहेत. शिवाजी महाराज यांचं नावं आज साडे तीनशे वर्ष झाले तरी नावं अखंड आहे. त्यांच्या नावाचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. त्यामुळेच आज लाखोंच्या संख्येने मोर्चा एकत्र आला आहे. जर माफी मागितली गेली नाही तर हा तरुण शांत बसणार नाही, असा इशाराही शरद पवार यांनी दिला. त्यांनी पुढे म्हटले की, आजचे राज्यकर्ते महापुरुषांचा अपमान करतात मला विधान भवनात जाऊन 55 वर्षे झाली अनेक राज्यपाल मी पाहिले. तत्कालीन राज्यपालांनी महाराष्ट्राच नावं लौकिक वाढवण्याचे काम केले. मात्र, हे राज्यपाल सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांच बिहार उत्तर प्रदेश, दक्षिणेत आदराने नाव घेतलं जाते आणि अशा महापुरुषांबाबत राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांची हकालपट्टी लवकरात लवकर करा. अन्यथा हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय रहाणार नाही असा इशारा शरद पवार यांनी दिला. 


शरद पवार यांनी म्हटले की, आजचा हा मोर्चा एका वेगळ्या परिस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. 70 वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबईत लाखोंचा मोर्चा निघाले होते. अजून महाराष्ट्रात येण्यासाठी सीमाभागातील मराठी भाषिकांचा प्रयत्न सुरू आहे. बेळगाव निपाणी कारवारमधील जनतेकडून सातत्याने महाराष्ट्रात सहभागी होण्याची मागणी केली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: