Maharashtra Politics : आदित्य ठाकरेंचे (Aditya Thackeray) निकवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक अमेय घोले शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अमेय घोले आदित्य ठाकरेंवर नाराज असून युवासेनेच्या व्हाट्सअॅप ग्रुपमधूनही लेफ्ट झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. अशातच आज पत्रकार परिषद घेत अमेय घोलेंनी (Amey Ghole)  आपली बाजू स्पष्ट केली. महाराष्ट्राच्या मनातील शिवसेना (Shiv Sena), युवासेना (Yuva Sena) ही बाळासाहेबांचीच आणि आम्ही कायम शिवसैनिकच राहणार. युवासेना आम्ही बाळाप्रमाणे सांभाळली, आदित्य ठाकरे आणि आम्ही बघितलेलं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं अमेय घोलेंनी सांगितलं. त्याचप्रमाणे नाराजी असल्याचंही अमेय घोलेंनी सांगितलं. यावेळी अमेय घोलेंनी कोणाचीही नावं घेण्यास नकार दिला. 


माजी नगरसेवक अमेय घोले पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, "महाराष्ट्रातील मनातील शिवसेना युवासेना ही बाळासाहेबांची आम्ही कायम शिवसैनिकच राहणार. युवासेना आम्ही बाळाप्रमाणे सांभाळली आहे. आदित्य ठाकरे आणि आम्ही बघितलेलं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण सध्या युवासेनेत मोनोरेल तयार झाली आहे. आमचा फिडबॅक आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचत नाही, मी माझं म्हणणं आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवलं आहे. माझी नाजारी मी व्यक्त केली आहे." तसेच, कोणाचंही नाव घेण्यात रस नसल्याचंही यावेळी अमेय घोले यांनी सांगितलं. 


"हक्काची युवासेना मोठी व्हावी यासाठी मी काम केलं आहे. स्थानिक स्तरावरील नियुक्त्या मेरीटवर झालेल्या नाहीत. याबाबत मी आदित्य ठाकरे यांना तक्रार केली होती. स्थानिक स्तरावरील नियुक्त्या या मेरीटवर झालेल्या नाहीत. याबाबत मी आदित्य ठाकरे यांना तक्रार केली होती. माझ्या वॅार्डमध्ये सर्वाधिक शपथपत्र देण्यात आली. पदही ॲान मेरिटच दिली जातात. परंतु, को‌अर कमिटीच्या सदस्यांना विचारलं जात नव्हतं. आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांनी मला भावाप्रमाणे, मित्राप्रमाणे सहकार्य केलंय. मी त्यांच्या सकारात्मक प्रतिसादाची वाट पाहत आहे. मी युवासेनेत आदित्य ठाकरे यांच्यासोबतच आहे.", असं अमेय घोलेंनी स्पष्ट केलं. 


"2014 साली कोणाची दार चढून, कोण तिकीटासाठी फिरत होतं, हे सगळ्यांनाच माहीत आहे. यावर मला बोलायचं नाही. वरिष्ठांच्या बाबतीत नाराजी नाही. परंतु, काही लोक वातावरण गढुळ करतायत. ग्रुपमध्ये लॅाजिकल चर्चा होत नाही. त्यामुळे ग्रुप सोडला. परंतु, याचा माझ्या लोकांसाठीच्या कामात काहीच अडथळा निर्माण होणार नाही.", असं अमेय घोले म्हणाले. 


दरम्यान, युवासेनेला शिंदे गट आणखी एक धक्का देण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचे कोषाध्यक्ष अमेय घोले आज झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीला गैरहजर राहिले, बैठकीचं निमंत्रण असतानाही अमेय घोले बैठकीला गैरहजर होते. आदित्य ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची देखील चर्चा होती, त्यातच युवासेनेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून लेफ्ट झाले. या सर्व घडामोडींमुळे अमेय घोले शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अमेय घोले शिंदे गटाच्या वाटेवर? नाराजीमुळे ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा