Maharashtra Politics : शिवसेनेत (Shiv Sena) झालेल्या बंडानंतर संपूर्ण राज्याच्या राजकारणाला वेगळंच वळण मिळालं. बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती अद्यापही सुरूच आहे. अनेक नगरसेवक, खासदार, आमदार आणि यांच्यासोबतच कार्यकर्तेही ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील झाले. आता असंच एक मोठं नाव शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक अमेय घोले हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अमेय घोले युवासेनेच्या व्हाट्सअॅप ग्रुपमधून लेफ्ट झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अमेय घोले (Amey Ghole) ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. 


युवासेना कोषध्यक्ष अमेय घोले यांनी युवासेना कोअर कमिटीच्या बैठकीला अनुपस्थिती दर्शवली आहे. बैठकीचं निमंत्रण असून देखील अमेय घोले अनुपस्थिती असल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. अमेय घोले आदित्य ठाकरेंवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. अनेक दिवसांपासून अमेय घोले हे आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या व्यक्तींवर नाराज आहे. एवढंच नाहीतर अमेय घोलेंनी ही नाराजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे बोलूनही दाखवल्याचं कळतंय. पण तरीदेखील याकडे वारंवार दुर्लक्ष केलं  जात असल्यामुळे अमेय घोले नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसेच, याच व्यक्तींमुळे युवासेनेचं नुकसान होत असल्याचं अमेय घोले यांचं म्हणणं आहे. 


अमेय घोले शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा आज पहिल्यांदा नाही होत आहेत. यापूर्वीही अनेकदा अशा चर्चा रंगल्या होत्या. यापूर्वी अमेय घोले यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जंगी स्वागत केल्यानं ही चर्चा सुरू झाली होती. मात्र, आपण शिवसेनेतच राहणार असल्याचं घोले यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. 


दरम्यान, अमेय घोले हे मुंबईतील वडाळा भागातील नगरसेवक आहेत. अमेय घोले हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात. युवा सेनेच्या कोअर टीममध्येदेखील घोले यांचा समावेश आहे. सध्या घोले नाराज असून ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे यावेळीही या फक्त अफवा ठरणार की, खरंच अमेय घोले यंदा एग्झिट शिंदे गटात जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


पाहा व्हिडीओ : Mumbai : युवासेना नेते Amey Ghole आदित्य ठाकरेंवर नाराज? पक्षाच्या बैठकीला दांडी ABP Majha



अमेय घोलेंनी काय दिलेलं स्पष्टीकरण? 


गणेशोत्सवा रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमेय घोले यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांच्या संपर्कात घोले असल्याच्या चर्चा त्यावेळी सुरू होत्या. याबाबत अमेय घोले यांनी त्यावेळी बोलताना सांगितलं होतं की, मी पदाधिकारी असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या भेटीसाठी आले होते. राज्यातील राजकीय संस्कृतीचा भाग म्हणून मी त्यांचे स्वागत केले असल्याचे घोले यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांचा माझ्यावर विश्वास असून मी शिवसेनेतच आहे."