Maharashtra News : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि सचिन वाझे (Sachin Vaze) यांचा ताबा आता सीबीआयला (CBI) देण्यात आला आहे. ईडीच्या (ED) तपासानंतर आता भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पुढील चौकशीसाठी सीबीआयला अनिल देशमुख, सचिन वाझे , संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे या चौघांचा ताबा हवा होता. त्यासाठी ईडीनं अटक केलेल्या प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या या चारही आरोपींचा ताबा घेण्यासाठी सीबीआयतर्फे मुंबई सत्र न्यायालयात करण्यात अर्ज आला होता. त्यावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाचे डी.पी. शिंगाडे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी सीबीआयचा हा अर्ज कोर्टानं स्वीकारला आहे. काही दिवसांपूर्वी कोर्टाच्या परवानगीनंच सीबीआयनं यांची कारागृहात जाऊन चौकशी केली होती. मात्र त्यात आरोपींनी पुरेसं सहकार्य न केल्यामुळेच केंद्रीय तपासयंत्रणेनं या चौघांचीही कस्टडीत चौकशी करण्याची मागणी करत कोर्टाकडे अर्ज केला होता.


देशमुखांचे स्विय सहाय्यक पालांडे आणि सचिव कुंदन शिंदे यांची यासंदर्भात आणखी चौकशी करण्यासाठी सीबीआयकडून न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. या दोघांचेही जबाब नोंदवण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी न्यायालयाकडे केली. त्याची दखल घेत पालांडे आणि शिंदे यांची अनुक्रमे 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी आर्थर रोड कारागृहात जाऊन चौकशी करण्याची परवानगी न्यायालयानं सीबीआयला दिली. तर, बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझेचीही चौकशी करण्याची मागणी तपास यंत्रणेकडून करण्यात आली होती. त्याचीही अनुमती देत न्यायालयानं सीबीआयला 15 आणि 16 फेब्रुवारी या दोन दिवशी तळोजा कारागृहात जाऊन सचिन वाझेची जबाब नोंदवण्यास परवानागी दिली होती. यापैकी संजीव पालांडे हे साल 1998 पासून सरकारी सेवेत कार्यरत आहोत. तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रेणीचे अधिकारी आहोत. आपल्या विरोधात तपासयंत्रणेकडे काहीही पुरावे नाहीत, असा दावाही पालांडे यांनी आपल्या स्वतंत्र याचिकेतून कोर्टात केला होता.


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या देशमुखांची ईडी मनी लाँड्रिंग आरोपांतर्गत चौकशी सुरू केली. 21 एप्रिल रोजी, देशमुखांविरोधात गुन्हा नोंदवून 12 तासांच्या चौकशीनंतर 1 नोव्हेंबर रोजी ईडीनं देशमुखांना अटक केली. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत. 29 डिसेंबर 2021 रोजी ईडीनं देशमुखांसह अन्य आरोपींविरोधात पुरवणी आरोपपत्र आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए) अंतर्गत विशेष न्यायालयात दाखल केलेलं आहे. सुमारे सात हजार पानांचे आरोपपत्र असून या प्रकरणातील हे दुसरे आरोपपत्र आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha