मुंबई : फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रातील सर्वात  मोठा घोटाळा झाला आहे. महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भाजपवर केले आहे.  भाजप सत्तेत असताना हरियाणाचा एक दूधवाला सात हजार कोटींचा मालक कसा झाला. ईडीला हे दिसत नाही का? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला. 


पीएमसी बँकेतील आरोपी राकेश वाधवानचा भाजपशी थेट आर्थिक संबंध


संजय राऊत म्हणाले, पीएमसी बँकेतील आरोपी राकेश वाधवानचा भाजपशी थेट आर्थिक संबंध आहे. राकेश वाधवान हा किरीट सोमय्यांचा मुलगा राकेश वाधवानचा पार्टनर आहे.  निकॉन इन्फ्रा कोणाची आहे हे मला विचारायचे आहे.  ही नील सोमय्याची आहे आणि तो वाधवानचा पार्टनर आहे मौजेमध्ये एक प्रकल्प त्यांनी उभारला आहे.   वाधवानला ब्लॅकमेल केलं आणि जमीनीसोबत 80-100 कोटी घेतले आहेत. राकेश वाधवानच्या खात्यातून 20कोटी गेले आहेत.  त्यांनी म्हणे पीएमसी बॅंक घोटाळा काढला म्हणे, पत्रा चाळ घोटाळा काढला.  मला त्रास देण्यासाठी माझ्या मित्रांना त्रास देतायत  पीएमसी घोटाळ्यातील पैसे वापरतायत, राकेश वाधवान आरोपी आहे आणि आम्ही पैसे वारतोय असं म्हणत आहेत.  


संपूर्ण प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी


 या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी.  पीएमसी बॅंकेचा तपास ईडी करतं आहे. त्यामुळे ईडीकडे मी हे कागदपत्र पाठवले. मात्र हा सोमय्या तिथे दही, खिचडी खातो.  हे सर्व ईडीचे एजंट झाले आहेत, असे देखील संजय राऊत या वेळी म्हणाले. 


मोहित कंबोज फडणवीसांना डुबवणार 


देवेंद्र फडणवीसांचा अजून एक फ्रंटमॅन आहे त्याचे मोहित कंबोज आहे. तो फडणवीसांना डुबवणार  आहे. पत्रा चाळ जमिनीत कंबोजचा पैसा  आसून पीएमसी बॅंक घोटाळ्याचा पैसा त्यात लागला आहे. राकेश वाधवान त्यांच्याकडून केबीजी ग्रुपनं 12 हजार कोटींची जागा 100 कोटींना घेतली. अनेक व्यवसाय कंबोजच्या केबीजी ग्रुपचे, पैसे कुठून आलेत याच माहिती फडणवीसांना माहिती आहे. 


संबंधित बातम्या :


Sanjay Raut : हम डरेंगे नहीं, हम झुकेंगे नही, आपको झुकाएंगे, संजय राऊतांनी दंड थोपटले