Shrivsena Leader Sanjay Raut Press Conference Key Highlights :  शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपवर तोफ डागली आहे. संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांवर आरोप लगावले आहेत. राऊत यांच्या या पत्रकार परिषदेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे 'साडे तीन' (Three and a half) नेते तुरुंगात जाणार असल्याचा दावा केल्यानंतर ते नेते कोण, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. शिवसेना आणि महाविकास आघाडीवर आरोप करणाऱ्या नेत्यांचा यामध्ये समावेश असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती.


>> संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे: 



> महाविकास आघाडीतील प्रत्येक नेत्याचा शिवसेनेला आशिर्वाद
> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून शुभेच्छा
> महाराष्ट्र XXची औलाद नाही, हे दाखवण्यासाठी पत्रकार परिषद
> शिवसेना, ठाकरे परिवार, शिवसेनेचे अनेक नेते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यामांगे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा
> भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून सरकार पाडण्याचे मनसुबे स्पष्ट
> भाजपचे सरकार पाडण्यासाठी आम्हाला मदत करा म्हणून विचारणा
> केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने राज्यातील प्रमुख नेत्यांना अटक करण्याची तयारी, भाजप नेत्यांचे वक्तव्य
> पवार कुटुंबीयांना सोडणार नाही, असे भाजप नेत्यांनी सांगितले


> धमकी म्हणून पवार कुटुंबीयांच्या घरी ईडीची धाड
> केंद्रीय पोलीस बलाला पाचारण करून सगळ्यांना थंड करू, भाजप नेत्यांची धमकी


> तपास यंत्रणांना हातीशी घेऊन भाजपने नालायकपणा सुरू केला; संजय राऊत यांचा आरोप


> अलिबागमध्ये ठाकरेंचे 19 बंगले दिसले तर राजकारण सोडणार; संजय राऊत यांचे सोमय्यांना आव्हान
> बंगले दिसले नाही तर शिवसैनिक सोमय्यांना जोड्याने मारणार, संजय राऊत यांचा इशारा
> 55 गुंठेच्या जमिनीसाठी ईडीकडून गावकऱ्यांना त्रास; संजय राऊत यांचा आरोप
> तिहारच्या तुरुंगात डांबण्याची ग्रामस्थांना ईडीची धमकी
> मुलीच्या लग्नातील मेंहदीवाल्याची चौकशी केली, ईडीकडे हेच काम राहिले का?
> एक दूधवाला पाच वर्षात सात हजार कोटी कमवू शकतो का? संजय राऊत यांचा सवाल


> हरियाणाचा एक दूधवाला पाच वर्षात सात हजार कोटी कमवू शकतो का? संजय राऊत यांचा प्रश्न
> फडणवीस यांच्या काळातील 3500 कोटी रुपये महाराष्ट्रातून गेले, मनी लॉड्रिंगचा प्रकार


> फडणवीस यांच्या काळात  महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा, संजय राऊत यांचा धक्कादायक आरोप


निल किरीट सोमय्याने पीएमसी बँक घोटाळ्याचा पैसा वापरला


> राकेश वाधवान यांच्या खात्यातून भाजपच्या खात्यात 20 कोटींची रक्कम गेली
> निकॉन इन्फ्रा कन्सक्ट्रशन कंपनीत निल सोमय्याची भागिदारी, पीएमसी बँक घोटाळ्याचा पैसा वापरला
> पीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवानची या कंपनीत भागिदारी


> पीएमसी बँक घोटाळ्यातील सर्व कागदपत्रे  ईडीकडे तीन वेळेस पाठवले


ईडीवाल्यांनो ऐका, हिंमत असेल तर घरी या , राऊत यांचे आव्हान


> जितेंद्र चंद्रलाल नवलानी कोण आहे, ईडीच्या अधिकाऱ्यांनी उत्तरं द्यावं; संजय राऊत यांचे आव्हान


> अमित शाह यांना फोन केला; राऊत यांचा खुलासा


>ज्या दिवशी कुटुंबीयांना त्रास दिला, जवळच्या लोकांना त्रास दिला त्यावेळी अमित शहांना फोन केला. तुमच्याबद्दल आदर, देशाचे गृहमंत्री आहात, माझ्यावर राग असेल तर मला अटक करा, असे कृत्य बंद करा असे थेट शाह यांना सांगितले. 


>> पत्रा चाळीची जमीन खरेदी करणारा मोहित कंबोज, हा कंबोज राऊत यांना बुडणार; राऊत यांचा इशारा