Mumbai Rain : हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडत आहे. मुंबईतही (Mumbai) पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतही विविध भागात पाऊस पडत आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, हवामानातील या बदलाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 


मुंबईसह ठाणे, कल्याणमध्येही पावसाची हजेरी


मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर तसेच ग्रामीण परिसरात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या पावसामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर आता पुन्हा मार्च पावसाने हजेरी लावली आहे. 


अचानक पाऊस आल्यानं शेतकऱ्यांची तारांबळ


गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमानाचा पारा वाढला आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याच्या झळा जाणवत आहेत. वातावरणातील उकडा वाढल्यामुळे घामाच्या धारा लागताना दिसत आहेत. अशातच हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज दिला होता. त्यानुसार मुंबईसह परिसरात पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. दरम्यान, या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यासह परभणीत (Parbhani) जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच परभणी, अकोला, बुलढाणा, सातारा, धुळे, वर्धा, अमरावती या जिल्ह्यातही पाऊस बरसत आहे. सध्या गहू, हरभरा, कांदा काढणीचे दिवस आहेत. मात्र, या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे.


शेती पिकांना फटका


सध्या रब्बी पिकांच्या काढणीचे दिवस सुरु आहेत. अशातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. यामुळे मानवी आरोग्यासही परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 15 मार्च ते 18 मार्च या दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे (Climate Change) शेती पिकांना फटका बसत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Unseasonal rain : बुलढाण्यासह परभणी जिल्ह्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांची तारांबळ; रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता