मुंबई : आसनगाव (Asangaon Railway)  रेल्वे स्थानकात लोकलच्या धडकेत वयोवृध्द महिलेचा मृत्यू झाला आहे. रेल्वे रुळ ओलांडून जात असताना हा अपघात  झाला आहे. कसाराहून आलेल्या लोकलची (Mumbai Local Accident) धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. दरम्यान, मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहेत. या घटनेमुळे कुटुंबीयावर शोककळा पसरली आहे.


सीताबाई पांढरे असे वयोवृद्ध महिलेचे नाव आहे. कसाराहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (csmt) कडे जाणाऱ्या  10:55 च्या N 14 नंबरच्या लोकलच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यानंतर आसनगाववरुन CSMT कडे जाणारी रेल्वे वाहतूक खोळंबली आहे. या मार्गावरील लोकल 15 मिनिटे उशिराने धावत आहे. रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणखी एक अपघात झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. आसनगाव रेल्वे स्थानकात कसाराकडे 2018 साली तोडलेला ओव्हर ब्रीज (FOB) अद्यापही बांधला नाही. त्यामुळे अपघातांची मालिका थांबत नाही, यामुळे आतापर्यंत अनेक नाहक बळी गेले आहे. 


रेल्वे प्रशासनानं लक्ष देण्याची आवश्यकता


अनेकदा वेळ वाचवण्याच्या हट्टापायी अनेकजण रेल्वे रूळ ओलांडून जातात. कित्येकदा तंबी देऊन देखील सुधारणा होत नाही. त्यामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. दिवा, आसनगाव रेल्वे स्थानकात प्रवासी सर्रासपणे रेल्वे रुळ ओलांडत असूनही रेल्वे पोलीस मात्र केवळ बघ्याच्या भूमिकेत उभे असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे येथील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याकडे रेल्वे प्रशासनानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे.


लोकलनं प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन


मुंबईतील लोकल सेवेवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे प्रवाशांची संख्या दररोज वाढत असताना लोकल फेऱ्या मात्र मर्यादित आहे. मुंबईच्या तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, प्रवाशांनी लोकलनं प्रवास करताना काळजी घ्यावी असं आवाहन रेल्वेकडून करण्यात येतं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Pune Railway Accident Viral : देव तारी त्याला कोण मारी! रेल्वे सुटत असताना आईची अवस्था पाहून मुलगी किंचाळली अन् खाकीतला देव धावून आला