Mumbai Coronavirus Cases : मुंबईत नव्याने आढळणाऱ्या कोरोना बांधितांच्या संख्येत घट होत असून दोन दिवसांपासून रुग्णसख्या एक हजारांखाली गेली होती. पण आज (2 फेब्रुवारी) ही रुग्णसंख्या पुन्हा एकदा एक हजारांवर पोहोचली आहे. मागील 24 तासांत कोरोनाचे (Corona) नवे 1 हजार 128 रुग्ण आढळले असून 1 हजार 838 जण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यामुळे मुंबईत सद्यस्थितीला 8 हजार 158 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. 


मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत बुधवारी 1 हजार 128 नवे कोरोनाबाधित आढळले असून 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर मागील 24 तासांत 1 हजार 838 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे. सध्या मुंबईतील 4 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच आज नव्याने सापडलेल्या 1 हजार 838 रुग्णांपैकी 108 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 37 हजार 185  बेड्सपैकी केवळ 1 हजार 953 बेड वापरात आहेत.  


मुंबईतील रात्रीची संचारबंदी मागे


मागील काही दिवसांपासून झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोना रग्णसंख्या घटल्यानं मुंबईतील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 1 फेब्रुवारीपासून, मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्यात आली आहे. तसेच मुंबईतील समुद्र किनारे, गार्डन, पार्क खुले होणार आहेत.  याशिवाय स्विमींग पूल, वॉटर पार्क, थिम पार्क 50 टक्के क्षमतेने सुरु होणार आहेत. 


ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला. मुंबईतील रुग्णसंख्या दोन दिवसापासून हजाराच्या आत आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या आता नियंत्रणात आल्याने मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha