मुंबई :  मुंबई पालिकेत शेवटच्या दिवशी भाजप नगरसेवकांचा गोंधळ पाहायला मिळाला.  पालिकेची मुदत संपताना भाजप नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. दरम्यान स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांविरोधात भाजप आक्रमक झालेलं  देखील पाहायला मिळाले. 


मुंबई महापालिकेची आज मुदत संपताना  शेवटची स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जवळपास 360 प्रस्ताव मांडण्यात आले असून  त्यातील बहुतांश प्रस्ताव हे मंजूर करण्यात आले.  कुठल्याही प्रकारची चर्चा न करता शेवटच्या दिवशी प्रस्ताव मंजूर केल्याने सहा हजार कोटींचा भ्रष्टाचार शिवसेना करत असल्याचा भाजप नगरसेवकांचा आरोप आहे.  भाजप नगरसेवकांकडून उद्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करत असताना हरकतीचा मुद्दा मांडण्यात आला. मात्र भाजप नगरसेवकांकडून कुठल्याच प्रकारे ऐकण्यास न आल्याने भाजप नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत गोंधळ घालायला सुरुवात केली.  स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू झाली. तसेच याविरोधात भाजपकडून मुंबई महापालिका आयुक्तांच्या कार्यालय बाहेरसुद्धा फलक घेऊन आंदोलन करण्यात आले आहे. 


मुंबई महापालिकेची मुदत 7 मार्च रोजी संपणार आहे. त्यानंतर पालिकेचा कारभार 8 मार्चपासून प्रशासकाच्या माध्यमातून सुरू राहणार आहे.  मुंबई महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर गेल्यानंतर काही दशकांनतर पहिल्यांदाच महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. 


मुंबईत आमचा भगवाच राहणार : किशोरी पेडणेकर


महापालिकेची मुदत आज संपणार आहे. निवडणूक न झाल्याने मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या आहेत की, निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचीच सत्ता येईल. तसेच मुंबईत आमचा भगवाच राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 


संबंधित बातम्या : 


BMC Election : मुंबईत नगरसेवक होण्यासाठी इच्छुकांची शिवसेनेत लॉबिंग सुरु