मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने चौथा उमेदवार बदलला आहे. डॉ. अजित गोपछडे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून रमेश कराड भाजपचे चौथे उमेदवार असतील. रमेश कराड हे लातूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत.


विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल (11 मे) शेवटचा दिवस होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र विकास आघाडीच्या पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यांच्यासोबतच भाजपकडून रमेश कराड यांनीही उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. रमेश कराड यांनी अचानक मुंबईत येऊन अर्ज भरल्याने त्यांना पक्षाची उमेदवारी मिळणार की डमी म्हणून वापर होणार अशी चर्चा रंगली होती. परंतु भाजपने डॉ. अजित गोपछडे यांच्याऐवजी रमेश कराड यांना आपला अधिकृत उमेदवार केलं.


Maharashtra MLC Election | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज भरला 


भाजपचे उमेदवार कोण?
भाजपकडून 8 मे रोजीच विधानपरिषदेसाठी डॉ. अजित गोपछडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. त्याच दिवशी त्यांनी उमेदवारी अर्जही भरले होते. भाजपकडून दिग्गजांना डावलत विधानपरिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी आहे. परंतु विधानपरिषद निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून रमेश कराड यांनीही अर्ज भरल्याने चर्चांना उधाण आलं होतं. पक्षाने जाहीर केलेल्यांपैकी एकाचा पत्ता कट होऊन रमेश कराड यांची वर्णी लागेल, असा अंदाजही वर्तवला जात होता. हीच शक्यता खरी ठरत रमेश कराड आता भाजपचे अधिकृत उमेदवार बनले आहेत.


भाजपकडून नव्या चेहऱ्यांना विधानपरिषदेवर संधी, का कापला भाजपमधील दिग्गजांचा पत्ता?



कोण आहेत रमेश कराड?
रमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक आहेत.
रमेश कराड हे लातूर जिल्हा बँकेची निवडणूक नाणेफेकीत हरले.
लातूर ग्रामीण मतदार संघातून दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवली, मात्र पदरी पराभवच पडला.


पाच दिवसात राष्ट्रवादी का सोडली? रमेश कराड म्हणतात...


पंकजांचा मास्टरस्ट्रोक, रमेश कराड यांचा अर्ज मागे!


21 मे राजी विधानपरिषद निवडणूक
कोरोना व्हायरसमुळे रखडलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली. येत्या 21 मे रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी म्हणजे 21 तारखेलाच मतमोजणी आणि निकाल जाहीर होईल.