बीड: लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मास्टरस्ट्रोक मारला आहे. कारण भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले उमेदवार रमेश कराड यांनी आश्चर्यकारकरित्या उमेदवारी मागे घेतली आहे.


गोपीनाथ मुंडेंचे खंदे समर्थक असलेल्या रमेश कराड यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीची बाबाजानी दुर्राणी  यांची जागा सोडून, रमेश कराड यांना विधानपरिषदेचं तिकीटही दिलं होतं.

मात्र आता त्यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने, या मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. कारण वेळ निघून गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे आता उमेदवारच नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने आता अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी याबाबतची माहिती एबीपी माझाला दिली.

या मतदारसंघात भाजपने सुरेश धस यांना उमेदवारी दिली आहे. धस यांची राष्ट्रवादीने हकालपट्टी केली आहे.

उस्मानाबाद- लातूर- बीडमध्ये रमेश कराड यांच्याविरोधात कोण?

कोण आहेत रमेश कराड?

रमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. पंकजा मुंडे या विधानपरिषदेच्या जागेसाठी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल नसल्याचं बोललं जातं होतं. रमेश कराड हे लातूर जिल्हा बँकेची निवडणूक नाणेफेकीत हरले.'



लातूर ग्रामीण मतदार संघातून दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवली, मात्र पदरी पराभवच पडला. रमेश कराड यांचे पंकजा मुंडेंव्यतिरिक्त भाजपातील इतर कुणाशी असे संबंध नाहीत, जे त्यांच्या मदतीला धावून येतील. याचाच फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला . रमेश कराड यांना उमेदवारी देत धनंजय मुंडे यांनी मोठी खेळी खेळली होती.

विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम

स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे.निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 मे अंतिम तारीख आहे. 21 मे रोजी मतदान होईल, तर 24 मे रोजी मतमोजणी होईल.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड , परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे.



संबंधित बातम्या

उस्मानाबाद- लातूर- बीडमध्ये रमेश कराड यांच्याविरोधात कोण?  


आता भविष्यात कुणाला भाऊ मानणार नाही : पंकजा मुंडे  


विधानपरिषद निवडणूक: लातूर राष्ट्रवादीला, परभणी काँग्रेसला