Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांना 1 मार्चपासून 10 टक्के पाणीकपातीला (Water Cut) सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणीसाठा वेगाने कमी होत असून केवळ 48 टक्के पाणीसाठी शिल्लक असून भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील पाणीसाठा मिळावा अशी मागणी मुंबई महानगरपालिकेने (Mumbai Municipal Corporation) राज्य सरकारकडे पत्राव्दारे केली आहे. राज्य सरकारने ही मागणी मान्य न केल्यास मोठ्या प्रमाणात पाणीकपातीला सामोरे जावं लागणार असल्याचं सांगितलं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारला पाणी प्रस्ताव दिल्याची माहिती आहे.


 


मुंबईकडे 48% पाणीसाठा


या संदर्भात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणाले, मुंबई महापालिकेने भातसा, अप्पर वैतरणा मधील अतिरिक्त साठा जलसंपदा खात्याकडे मागितलाय. दरवर्षी हा साठा मागितला जातो. यंदा मुंबईकडे पाणीसाठा 48% आहे. हा साठा 15 टक्क्यांवर गेल्यानंतर पाण्याच्या रिझर्व स्टॉकची गरज भासते. दरवर्षी मुंबई महापालिका जलसंपदा खात्याकडे पाणीसाठा 50% च्या खाली येऊ लागला की, रिझर्व स्टॉक साठी पत्र देते. या संदर्भातील पत्र दोन-तीन महिने आधी द्यावे लागते. जलसंपदा खात्यानं अधिकचे पाणी इतर ठिकाणी वापरु नये याकरता मुंबई महापालिका मुदतीत पत्र देते. यंदाच्या वर्षी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर पर्यंत समाधानकारक पाऊस पडला नाही. एरव्ही 15 ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडतो. त्यामुळे पाण्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे राखीव साठ्याची मागणी केली असून हा राखीव साठा न मिळाल्यास पाणी कपात करावी लागेल, असेही ते म्हणाले.


 


13 फेब्रुवारी 2024 रोजी पर्यंतचा तलावातील पाणीसाठा


तलाव (दशलक्ष लिटर) टक्के


मोडकसागर 55,077 42.72


तानसा 83,522 57.57


मध्य वैतरणा 16,694 8.77


भातसा 3,49,678 48.77


विहार 16,235 58.62


तुळशी 4,734 58.84


 


मागच्या वर्षी जूनमध्येही पाणीसाठी मागणी 


मागील वर्षीही पाऊस कमी पडल्यामुळे जून 2023 मध्ये मुंबई पालिकेने राज्य सरकारकडे राखीव साठ्याची मागणी केली होती. तेव्हा ही पाणी कपात टळली होती. मात्र जुलै 2023 मध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने अखेर 10 टक्के कपात करावी लागली होती. त्यानंतर पाणीसाठा 81 टक्के झाल्यानंतर ऑगस्ट 2023 मध्ये ही पाणीकपात रद्द करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा पाणी कपातीचे संकट घोंगावत आहे. मात्र यंदा सातही तलावातील पाणीसाठी आणखी कमी झाल्यास भातसा, अप्पर वैतरणा मधील अतिरिक्त साठा मुंबईच्या वाट्याला येतो का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे


 


हेही वाचा>>>


Maharashtra School : प्राथमिक शाळा नऊ वाजेनंतर भरवण्याच्या निर्णयाला स्कूलबस मालकांचा विरोध