मुंबई : देशात कोरोना संक्रमित रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात होती. अशा परिस्थितही राज्याने कोविडचा चांगला मुकाबला केला आहे. त्यामुळेच दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर कोविडचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत कोरोना वाढीचा वेग किंवा मृत्यू दर महाराष्ट्रात कमी आहे, असे दिसते, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.
2 फेब्रुवारी 2021 च्या आकडेवारीनुसार दर दशलक्ष लोकसंख्येत दिल्लीत 37 हजार 844, गोव्यात 36 हजार 732, पौंडेचरीत 31 हजार 350, केरळमध्ये 28 हजार 89, चंडीगडमध्ये 19 हजार 877 इतके पॉझिटीव्ह रुग्ण होते. त्यामानाने महाराष्ट्रात यादिवशी 16 हजार 8 रुग्ण होते. राज्याचा क्रमांक यामध्ये देशात सहावा होता.
Coronavirus नेमका आला कुठून, कसा फैलावला; निरीक्षणातून मिळाले नवे संकेत
एकूण मृत्यूंची सख्या महाराष्ट्रात जास्त असली तरी दर दशलक्ष लोकसंख्येत मृत्यूचे प्रमाण इतर राज्याच्या तुलनेत कमी आहे. 2 फेब्रुवारी 2021 रोजीच्या आकडेवारीनुसार दिल्लीत 647, गोवामध्ये 527, पौंडेचरीत 522, आणि महाराष्ट्रात 403 मृत्यू झाले. त्यामुळे महाराष्ट्र हे दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर सर्वाधिक मृत्यू असलेले राज्य म्हणता येणार नाही.
Covid 19 Test: आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कोणत्या कोविड -19 चाचण्या आवश्यक आहेत?
कोरोनाच्या वाढत्या दराचा विचार केला तर 3 फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दररोजचा कोविड वाढता दर होता 0.10% तर केरळचा दर महाराष्ट्रापेक्षा सहा पट जास्त म्हणजे 0.61%, गोवा 0.2%, पंजाब 0.12%, गुजरात आणि छत्तीसगड 0.11% असा दर होता. सक्रीय रुग्णाबाबत महाराष्ट्रात दर दशलक्ष लोकसंख्येत 290, रुग्ण असताना केरळमध्ये 2000 पेक्षा जास्त सक्रीय रुग्ण आज आहेत.
मुंबईतील दाट लोकवस्ती असलेल्या धारावी सारख्या भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने ज्या उपाययोजना केल्या आणि त्याच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे त्याभागातील संसर्ग रोखण्यात यश आले आशा या धारावी पॅटर्नची दखल जागतिकस्तरावर घेतली गेली. जागतिक आरोग्य संघटनेने या पॅटर्नचे कौतुक करतानाच अन्य राज्यांनी देखील त्याचा अवलंब करण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेने केल्या.