मुंबई: मनोरा आमदार निवासात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्या खोलीत छत कोसळल्यानंतर, राज्य सरकारने आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
सरकारने 175 आमदारांना दक्षिण मुंबईत सुरक्षित ठिकणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे स्थलांतर दोन ते तीन वर्षांसाठी असेल.
राज्याच्या प्रधान सचिवांनी याबाबत आजच जाहिरात दिली आहे. आमदारांसाठी 450-500 स्क्वेअर फूट कार्पेट एरियाचा फर्निचर सुसज्जचा फ्लॅट भाड्याने हवा आहे, असं या जाहिरातीत म्हटलं आहे.
कफ परेड, नरीमन पॉईंट, वाळकेश्वर, मलबार हिल, वडाळा आणि दादर या भागातील फ्लॅट्सना प्राधान्य देण्यात येणार आहे.
संबंधित फ्लॅट्स हे अधिकृत आणि मुंबई महापालिकेच्या नियमांनुसार उभारलेले असावेत. तसंच त्यामध्ये लिफ्टसारख्या सुविधा हव्या. तसंच असे फ्लॅट्स दोन ते तीन वर्षांसाठी भाड्याने हवे आहेत, असं जाहिरातीत म्हटलं आहे.
छत कोसळल्याने सरकारची धावपळ
मुंबईतील मनोरा आमदार निवासात जळगावचे राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांच्या खोलीत रविवारी रात्री छत कोसळलं. छत कोसळलं त्यावेळी रुममध्ये कोणीही उपस्थित नव्हतं. खोली उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकाराचे पडसाद विधानसभेत उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी याबाबत सरकारला विचारणा केली. तसंच आमदारांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला.
यानंतर मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेण्याचं आश्वासन दिलं होतं.
175 आमदारांना सुसज्ज फ्लॅट्स हवे, छत कोसळल्यानंतर सरकारची जाहिरात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Aug 2017 02:54 PM (IST)
मनोरा आमदार निवासात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्या खोलीत छत कोसळल्यानंतर, राज्य सरकारने आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -